शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:50 IST

Air India Flight AI2913 catches fire : कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे अलार्ममुळे कळले...

Air India Flight AI2913 catches fire : दिल्लीहून इंदूरला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट AI2913 टेकऑफ केल्यानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमानाच्या कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर, मानक प्रक्रियेनुसार, इंजिन बंद करण्यात आले आणि विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान चौकशीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, पर्यायी विमान तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे त्यांना इंदूरला घेऊन जाईल.

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

अलार्म वाजताच आणि कॉकपिटमध्ये आगीचे संकेत मिळाले. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परंतु वैमानिकाने तातडीने आवश्यक ती खबरदारी घेतली आणि इंजिन बंद करून विमान हवेत नियंत्रणात ठेवले, त्यानंतर वैमानिकाने दिल्ली विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवले. काही मिनिटांतच सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड

एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडत असतात. अलिकडेच, १८ ऑगस्ट रोजी, कोची विमानतळावरून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक उड्डाणापूर्वी थांबवावे लागले. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी एअर इंडियाने मिलान (इटली) ते दिल्लीला जाणारे विमान शेवटच्या क्षणी रद्द केले होते. दोन्ही घटनांमागे तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. एअरलाइनच्या विमानांमध्ये सतत अशा समस्या येत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानpilotवैमानिकdelhiदिल्ली