Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या अहवालावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विमानात कोणतेही यांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका, असं म्हटले आहे.
सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आणि अपघाताबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नका असा सल्ला दिला.
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
या अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून, डीजीसीएच्या देखरेखीखाली एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 विमानांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी काही दिवसांत पूर्ण झाली आणि सर्व विमाने उड्डाणासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळून आले, असंही सीईओंनी सांगितले.
सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, "आम्ही सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आहेत आणि भविष्यात जर काही नवीन तपासण्या सुचवल्या गेल्या तर त्याही पूर्ण करू. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना या अपघातावर घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे आवाहन केले. तपास अजूनही सुरू आहे आणि संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी वेळ लागेल, असंही त्यांनी सांगितले.
एअर इंडिया तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे. एएआयबीचा अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे, तो या अपघाताचे खरे कारण स्पष्ट करेल.
एअर इंडियाच्या सीईओ यांचे हे विधान फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही तर जनतेसाठी सुद्धा आहे. हा अपघात नेमका कसा घडला हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे.