Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाविमानअपघाताला दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्या अपघातातविमानातील २४२ जणांपैकी फक्त एकाचा जीव वाचला, तर उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. अद्याप या अपघाताचे स्पष्ट कारण समोर आले नाही. दरम्यान, तपासात असे दिसून आले आहे की, अपघाताचे एक प्रमुख कारण दोन्ही इंजिनमधील बिघाड असू शकतो.
तपासात काय आढळले?मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपासकर्त्यांनी आणि एअर इंडियाच्या वैमानिकांनी सिम्युलेटरमध्ये त्या अपघाताच्या परिस्थितीची पुनरावृत्ती केली. त्यांनी पाहिले की, लँडिंग गियर उघड्यानंतर, ते परत बंद करताना विमान कोसळू शकते का? परंतु सिम्युलेटर चाचणीत असे आढळून आले की, केवळ या कारणांमुळे विमान कोसळत नाही.
इमर्जन्सी पॉवर सिस्टिमने दिला इशारा अपघातापूर्वी विमानातील आपत्कालीन पॉवर टर्बाइन आपोआप सुरू झाले होते. जेव्हा विमानाचे दोन्ही इंजिन काम करणे थांबवतात, तेव्हाच ही सिस्टीम चालू होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी विमानातील संपूर्ण वीजपुरवठा बंद झाल्याचा संशय आणखी वाढला आहे. यावरुन इंजिन किंवा पॉवर सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे दिसून आले.
विंग फ्लॅप्स आणि लँडिंग गियरवर शंकाव्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसून आले की, विमान टेकऑफनंतर उंचीवर जाण्याऐवजी थेट कोसळले. सिम्युलेटर चाचण्यांमध्ये असे दिसून आले की लँडिंग गियर अर्धा दुमडलेला होता परंतु त्याचे दरवाजे उघडले नाहीत, जे हायड्रॉलिक बिघाड किंवा वीज पुरवठा बिघाड दर्शवते.
तपासकर्त्यांनी काय म्हटले?आतापर्यंत एएआयबी (विमान अपघात तपास ब्युरो) आणि एअर इंडियाने अधिकृतपणे काहीही सांगितले नाही, परंतु सूत्रांनुसार अपघाताचे कारण आता तांत्रिक बिघाडाकडे वळले आहे. ब्लॅक बॉक्स (फ्लाइट रेकॉर्डर) च्या डेटाची तपासणी अजूनही सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणखी माहिती समोर येईल.