एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 01:01 IST2025-06-30T01:00:01+5:302025-06-30T01:01:00+5:30

Air India : हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे.

Air India flight from Tokyo to Delhi makes emergency landing in Kolkata due to problem | एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या AI३५७ या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. कॅबिनमध्ये गर्मी जाणवू लागल्यने, सुरक्षितता लक्षात घेत पायलटने हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला.

हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे. याशिवाय, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी, आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जात आहे. प्रवाशांना दिल्लीला पोहोचवण्यासाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.

फ्लाइट ट्रॅकिंग साइट्सवरील माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान AI३५७ रविवारी (२९ जून २०२५) भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३१ वाजता टोकियो हनेडा येथून दिल्लीसाठी निघाले. मात्र, एसीमध्ये बिघाड झाल्याने, विमान दुपारी ३.३३ वाजता कोलकात्यात उतरवण्यात  आले.

चेन्नईला जाणारे विमान मुंबईला परतले - 
तत्पूर्वी, याच पद्धतीने शुक्रवारी (27 जून) मुंबईहून चेन्नईला जाणेरे एअर इंडियाचे विमान AI६३९ उड्डाणानंतर, पुन्हा मुंबईला परतले होते. उड्डाणानंतर, विमानाच्या केबिनमध्ये काही जळाल्याचा बास येण्याची तक्रार मिळाली होती. 

Web Title: Air India flight from Tokyo to Delhi makes emergency landing in Kolkata due to problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.