पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:37 IST2025-06-17T13:35:46+5:302025-06-17T13:37:05+5:30
अहमदाबाद विमान अपघातानंतर सुमारे ५ दिवसांनी एअर इंडियाचे विमान पुन्हा लंडनला जाणार होते. पण, उड्डाणापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला.

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
Air India: गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर विमान उड्डाणांबाबत बरीच खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता आज(दि.17) पुन्हा एकदा अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे अचानक एअर इंडियाचे विमान AI-159 रद्द केल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.
Air India's Ahmedabad-London flight cancelled due to operational issues: Airport officials. pic.twitter.com/Lym3f99cni
— Press Trust of India (@PTI_News) June 17, 2025
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान अहमदाबादेतूनच लंडनला जाणार होते. परंतु उड्डाणापूर्वी त्याची तपासणी करण्यात आली असता, त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यामुळे विमानाची उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आली. अचानक उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. या विमानातील बहुतांश प्रवासी इतर शहरातील आहेत. आता या विमानाची उड्डाण कधी होणार, हे अद्याप सांगण्यात आले नाही.
एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये बिघाड
गेल्या आठवड्यात अहमदाबादच्या झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत बिघाडाच्या बातम्या येत आहेत. काल हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाची तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली, तर अमेरिकेहून मुंबईला येणाऱ्या एका विमानाला कोलकातामध्ये उतरवावे लागले.
#WATCH | An IndiGo flight 6E 2706 from Muscat - Kochi - Delhi made an emergency landing at Nagpur airport after a bomb threat was received. All passengers have been deboarded, investigation is underway, nothing suspicious has been found so far.
— ANI (@ANI) June 17, 2025
Visuals from Nagpur airport in… https://t.co/QQax2PkdN2pic.twitter.com/ANzfaJzm2U
इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी
आज सकाळी 9.20 वाजता, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6ई 2706 ला बॉम्बची धमकी मिळाली, त्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये विमान क्रमांकाचाही स्पष्ट उल्लेख असल्याने धोका गंभीर असल्याचे मानण्यात आले.