Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:14 IST2025-06-12T15:20:22+5:302025-06-13T11:14:23+5:30

Air India Plane Crash: गुजरातमधील  अहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा  विमान अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा ...

Air India Ahmedabad Plane Crash Live Updates: London-bound passenger plane carrying more than 240 people crashes after take-off | Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक

Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमानअपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला.अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाने उड्डाण केल्या-केल्या लगेचच मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळलं. विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. वृत्तसंस्था एएनआयनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते.

LIVE

Get Latest Updates

13 Jun, 25 : 02:14 PM

अहमदाबाद विमान अपघाताची एटीएस करणार चौकशी

अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करणार आहे. या प्रकरणात, अपघातस्थळावरून एक डीव्हीआर सापडला आहे, जो एटीएसने ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक टीमनेही अपघातस्थळावरून नमुने गोळा केले आहेत, जे तपासासाठी पाठवले जातील.

13 Jun, 25 : 01:27 PM

एअर इंडिया विमानातील ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज ढिगाऱ्यात बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडले आहे. त्यामुळे लवकरच अपघाताचे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.

13 Jun, 25 : 11:17 AM

अहमदाबाद विमान अपघातावर पंतप्रधान मोदींची पोस्ट

"आज अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. विध्वंसाचे दृश्य दुःखद आहे. त्यानंतर अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि टीमना भेटलो. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आमच्या संवेदना कायम आहेत. अहमदाबादमधील दुर्घटनेने आपण सर्वजण दुःखी झालो आहोत. इतक्या अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतके जीव गमावणे शब्दांपलीकडे आहे. सर्व शोकाकुल कुटुंबांसाठी आम्ही संवेदना देतो. मला त्यांचे दुःख समजते आहे आणि हे देखील माहित आहे की मागे पडलेली पोकळी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत जाणवेल, ओम शांती," असं पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

13 Jun, 25 : 11:05 AM

विमान अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी विमानतळावर घेतली आढावा बैठक

अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

13 Jun, 25 : 09:28 AM

अहमदाबाद विमान अपघात: जखमींना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले

अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनास्थळाचा पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

13 Jun, 25 : 09:16 AM

पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमान अपघाताच्या ठिकाणी पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमान अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यानंतर ते रुग्णालयाला भेट देतील आणि पीडित कुटुंबियांना भेटतील.

13 Jun, 25 : 08:51 AM

अहमदाबाद विमान अपघात: बीजे मेडिकल कॉलेजच्या डीनचा अपघातात मृत्यू

अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या डीन मीनाक्षी पारीख यांचाही या अपघातात मृत्यू झाला. तसेच मेसमधील अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला. ५ जणांची प्रकृती गंभीर असून १३ वैद्यकीय विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

13 Jun, 25 : 08:23 AM

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली रुपानी भारतात दाखल

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली रुपानी भारतात दाखल, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी केलं त्यांचं सांत्वन 

13 Jun, 25 : 07:31 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार अपघातस्थळाला भेट

पंतप्रधान मोदी आज अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातस्थळाला भेट देणार आहेत.
 

13 Jun, 25 : 06:24 AM

अहमदाबादमधील विमान अपघातात विमानामधील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू, एअर इंडियाने दिला दुजोरा

अहमदाबादमधील विमान अपघातात विमानामधील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू, एअर इंडियाने दिला दुजोरा 

13 Jun, 25 : 05:23 AM

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबाबत जगभरातून शोक व्यक्त, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मानले आभार

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबाबत जगभरातून शोक व्यक्त, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मानले आभार

13 Jun, 25 : 04:46 AM

अमेरिकेतील NTSB ची टीम अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासात करणार भारताची मदत

अमेरिकेतील NTSB ची टीम अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपासात करणार भारताची मदत, तज्ज्ञांचं पथक भारतात पाठवणार असल्याची केली घोषणा 

13 Jun, 25 : 04:28 AM

अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी बचावकार्य पूर्ण, २६५ जणांचा मृत्यू

अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी बचावकार्य पूर्ण, २६५ जणांचा मृत्यू, नरेंद्र मोदी आज सकाळी घटनास्थळी भेट देणार  

13 Jun, 25 : 12:11 AM

विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू; अतिरिक्त २४ मृत्यांमध्ये इंटर्न डॉक्टरही...

अहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू, विमान अपघातात २४ जणांचा मृत्यू

12 Jun, 25 : 11:00 PM

विमान अपघाताच्या चौकशीसाठी डीजीसीएची टीम पोहोचली, पंतप्रधान मोदी उद्या अहमदाबादला जाऊ शकतात

विमान अपघाताच्या चौकशीसाठी डीजीसीएची टीम पोहोचली, पंतप्रधान मोदी उद्या अहमदाबादला जाऊ शकतात

12 Jun, 25 : 10:12 PM

विमानात इंधन जळत असल्याने तापमान इतके वाढले की कोणालाही वाचवण्याची शक्यता कमी होती, असे अमित शहा म्हणाले.

विमानात इंधन जळत असल्याने तापमान इतके वाढले की कोणालाही वाचवण्याची शक्यता कमी होती, असे अमित शाह म्हणाले.

12 Jun, 25 : 10:09 PM

"डीएनए चाचणीच्या निकालानंतर विमान अपघातातील मृतांची अंतिम संख्या": अमित शहा

"डीएनए चाचणीच्या निकालानंतर विमान अपघातातील मृतांची अंतिम संख्या": अमित शहा

12 Jun, 25 : 08:31 PM

विमान अपघात स्थळी अमित शाह यांनी केली पाहणी

विमान अपघात स्थळी अमित शाह यांनी केली पाहणी

 

12 Jun, 25 : 07:57 PM

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन

अहमदाबाद विमान अपघातात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील त्याच विमानात होते, ज्यांच्या मृत्यूची गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी पुष्टी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. आतापर्यंत या अपघातात २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. ४१ जखमींवर उपचार सुरू आहेत. 

12 Jun, 25 : 07:47 PM

गृहमंत्री अमित शहा विमान अपघातस्थळी पोहोचले, गुजरातचे मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत आहेत

अहमदाबाद विमान अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मदत आणि बचाव कार्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील त्यांच्यासोबत होते. गृहमंत्र्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आणि जखमींवर उपचार, ढिगारा हटवणे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

12 Jun, 25 : 07:18 PM

एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली

अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान विमानतळ परिसरातच कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे विमान नजिकच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेलमधील इंटर्न डॉक्टरांचाही मोठ्या संख्येने यात मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच या विमान अपघातातील कोणाचीही वाचण्याची शक्यता वाटत नसल्याचे वक्तव्य हमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक केले आहे. परंतू, तरीही काहीजण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. 

12 Jun, 25 : 06:43 PM

जिवंत वाचण्याची शक्यता खूपच कमी - अहमदाबाद पोलीस आयुक्त

अहमदाबाद पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले की, अपघाताची तीव्रता पाहता कोणत्याही प्रवाशाची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. विमान निवासी भागात कोसळल्याने, काही स्थानिक लोकांचाही मृत्यू झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे, त्यांचा जीव वाचणे कठीण आहे.

12 Jun, 25 : 06:40 PM

अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले

मोठी जीवितहानी झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ठिकाणांहून आतापर्यंत १०० मृतदेह मिळाले आहेत. तर वसतिगृहातील सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानाच्या सांगड्यात माणसांचे मृतदेह होरपळल्याने अडकले. त्यामुळे ते बाहेर काढण्यास प्रचंड अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे. काही मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसले. 
 

12 Jun, 25 : 06:39 PM

८ मिनिटांत नेमकं काय घडलं?

हे एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर एक मोठे विमान आहे. हे ११ वर्षे जुने विमान आहे. गुरुवारी दुपारी १:३० वाजता उड्डाण करण्यापूर्वी ते धावपट्टीच्या मध्यभागी होते. दुपारी १:३८ वाजता विमान धावपट्टीच्या शेवटी होते. विमानाने उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण घेतले आणि समुद्रसपाटीपासून ६२५ फूट उंचीवर सिग्नल गमावला. विमानतळ समुद्रसपाटीपासून सुमारे २०० फूट उंचीवर आहे, म्हणजेच विमान विमानतळापासून सुमारे ४०० फूट उंचीवर उड्डाण केले. विमानाचा सिग्नल सुमारे ८ मिनिटे सक्रिय राहिला आणि दुपारी १:३९ वाजता विमान कोसळले.
 

12 Jun, 25 : 06:32 PM

"माझा मुलगा लंच ब्रेक दरम्यान हॉस्टेलमध्ये गेला होता, तेव्हाच तिथे विमान कोसळलं"


 

12 Jun, 25 : 06:27 PM

"माझी वहिनी लंडनला जात होती, एका तासातच मला विमान अपघात झाल्याची बातमी समजली"


 

12 Jun, 25 : 06:19 PM

सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर

राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या भाच्याची पत्नी देखील एअर इंडियाच्या क्रूमध्ये होती. अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांची पत्नी आहेत. अमोल देखील स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. दोन तासांपूर्वी ते दिल्लीत लँड झाले असून आता ते अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक परिवाराने सांगितले.
 

12 Jun, 25 : 06:12 PM

MAYDAY कॉल केव्हा दिला जातो?

हा एक रेडिओद्वारे दिला जाणारा सिग्नल आहे, जो खूप गंभीर परिस्थितीत, जीवाला धोका असल्यास वापरला जातो. तो तीन वेळा दिला जातो. कारण यामुळे स्पष्ट होतं की हा विनोद किंवा चुकीचा कॉल नाही, तर खरी आपत्ती आहे. हा कॉल पुढील गंभीर परिस्थितींमध्ये दिला जातो. 
१. विमान किंवा जहाज अपघाताच्या उंबरठ्यावर असेल
२. इंधन संपण्याची स्थिती
३. इंजिन फेल होणे
४. हवामान खराब होऊन विमानाचे नियंत्रण गमावणे
५. आग लागणे
६. प्राणघातक वैद्यकीय आपत्ती 
७. दहशतवादी हल्ला किंवा विमान अपहरण

12 Jun, 25 : 06:09 PM

अहमदाबाद दुर्घटनेत वैमानिकाने दिलेला कॉल

अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानात क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफीसर होते. तर सुमित सबरवाल आणि अपर्णा महाडिक हे सहकारी क्रू होते. एअर ट्राफिक कंट्रोलला MAYDAY कॉल दिला गेला होता. पण हा कॉल दिल्याच्या पुढच्याच सेकंदात विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी बिघाड झाल्यानं ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

12 Jun, 25 : 06:05 PM

MAYDAY कॉलचा उद्देश काय?

MAYDAY कॉलचा उद्देश हा जवळच्या ATC (Air Traffic Control) किंवा नौदल नियंत्रणेला लगेच सतर्क करणे असा असतो. जेणेकरुन तातडीने मदत मिळावी. जसे की रेस्क्यू टीम, अग्निशमन दल आणि इतर तांत्रिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचाव्यात यासाठी या कॉलची मदत होते. यासोबत त्या परिघात इतर विमानांच्या वाहतूक रोखण्यासाठीही अलर्ट या माध्यमातून मिळतो.
 

12 Jun, 25 : 06:02 PM

विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक?

लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानामध्ये १६९ भारतीय नागरिक होते. तर ५३ नागरिक ब्रिटनचे होते. प्रवासी १ कॅनडाचा होता. तर ७ पोर्तुगीजे नागरिक होते. या विमानात स्त्री आणि पुरुष मिळून एकूण २१७ प्रौढ प्रवासी होते. तर ११ लहान मुलं होती. 
 

12 Jun, 25 : 05:56 PM

विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो आला समोर

12 Jun, 25 : 05:47 PM

वसतिगृहावर कोसळले विमान


 

12 Jun, 25 : 05:40 PM

जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच

एअर इंडिया विमानाचा अपघात घडला त्यावेळी तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं. तो म्हणाला, "एअर इंडियाचे हे विमान कोसळले तेव्हा मी घरी होतो, अचानक एक स्फोटक आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून आम्ही बाहेर येऊन पाहिलं, तेव्हा समोर काळसर धुराचे मोठे लोट दिसत होते. जेव्हा आम्ही धावत धावत इथे पोहोचलो, तेव्हा अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि मृतदेह सगळीकडे विखुरलेले दिसले."
 

12 Jun, 25 : 05:32 PM


 

12 Jun, 25 : 05:24 PM

११ वर्षे जुने बोईंग विमान

बोईंग 787 ड्रीमलायनरचे डिझाइन केलेले आयुष्य ४४,००० उड्डाण चक्रांचे आहे. ते त्याला ३० ते ५० वर्षांचे संभाव्य आयुष्य देते, तर बहुतेक व्यावसायिक जेट्स तेवढ्या काळासाठी सेवेत राहत नाहीत. अहमदाबादमध्ये अपघात झालेले विमान फक्त साडे अकरा वर्षे जुने होते.
 

12 Jun, 25 : 05:14 PM

पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...

अहमदाबादविमानतळावरीलएअर इंडियाच्याविमानाच्या अपघातामुळे देश हळहळला आहे. दुपारी बोईंग एआय - १७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच दोन मिनिटांनीच विमानाचे इंजिन फेल झाले. पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, परंतू विमान एवढ्या कमी उंचीवर होते की पायलटही काही करू शकले नाहीत आणि विमान झाडांवर आदळले व मोठा अपघात झाला. 
 

12 Jun, 25 : 05:03 PM

विमानातील क्रू मेंबर्सची नावे

क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर 

सुमित सबरवाल 

अपर्णा महाडिक 

श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1

दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2

इरफान शेख 

नंथेम सिंगसेन

मैथिली पाटील 

मनीषा थापा

12 Jun, 25 : 04:54 PM

विमान अपघातानंतर मोदींची प्रतिक्रिया


 

12 Jun, 25 : 04:49 PM

"हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही"

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने धक्का बसला असून दुःखी आहे. हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकाबरोबर माझ्या संवेदना आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 

12 Jun, 25 : 04:47 PM

विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट


 

12 Jun, 25 : 04:42 PM

आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना

 एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक संदेश जारी केले आहे. अहमदाबादहून लंडन गॅटविक येथे जाणारे एअर इंडियाचे फ्लाईट AI171 याचा आज अपघात झाला. या वृत्ताची मी अत्यंत दुःखी मनाने पुष्टी करतो. या दुर्दैवी घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांसोबत आमच्या संवेदना आहेत. सध्या आमचे प्राथमिक उद्देश सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हेच आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ते सर्व मदत करण्यासाठी आमच्या शक्तीनुसार सर्व प्रयत्न करत आहोत. अधिक तथ्ये आणि तपशीलवार माहिती मिळताच पुढील अपडेट्स शेअर केले जातील. अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी एक आपत्कालीन केंद्र ( An emergency centre ) आणि मदत पथक ( support team ) स्थापन करण्यात आले आहे, असा संदेश एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिल्याचे टाटा ग्रुपच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 

12 Jun, 25 : 04:37 PM

एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले

२४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमानअहमदाबाद विमानतळाबाहेरील परिसरात असलेल्या डॉक्टरांसाठीच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेल परिसरातील वाहने जळून खाक झाली असून हॉस्टेलमधील विश्रांती घेत असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
 

12 Jun, 25 : 04:35 PM

अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली


 

12 Jun, 25 : 04:29 PM

Ahmedabad Plane Crash Live News: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे ट्विट


 

12 Jun, 25 : 04:29 PM

MAYDAY, MAYDAY, MAYDAY…

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता. त्यामधून वैमानिकाने विमानातील गंभीर आणीबाणीचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले.  
 

12 Jun, 25 : 04:15 PM

उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले

डीजीसीएने विमान अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एअर इंडियाच्या बी७८७ या विमानाने अहमदाबादहून गेटविकच्या दिशेने उड्डाण केले होते.  मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. या विमानामधून एकूण २४२ जण प्रवास करत होते. त्यामध्ये २ वैमानिक आणि १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते. तर त्यांच्यासोबत क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफिसर होते. सुमित सभरवाल यांना ८ हजार २०० तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. तर क्लाईव्ह यांना ११०० तासांचा अनुभव आहे.
 

12 Jun, 25 : 04:07 PM

अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्य

अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात रहिवासी भागावर हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे दुर्घटनाग्रस्त भागातील काही इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. तर परिसरातील वाहनं देखील जळून खाक झाली आहेत. वाहनांचे तर फक्त सांगाडे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. 

12 Jun, 25 : 04:03 PM

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची प्रतिक्रिया

अपघाताबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू म्हणाले की, अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला आणि प्रंड दुःख झाले. आम्ही सर्वजण अलर्ट आहोत. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व विमान वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत आणि घटनास्थळी वैद्यकीय मदत आणि मदत पोहोचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
 

12 Jun, 25 : 04:02 PM

अपघाताचे अपडेट्स...

एआय171 क्रमांकाचे विमान अहमदाबादहून लंडनसाठी दुपारी 1.17 निघाले.
दुपारी 1.20 वाजता मेघनानी नगर परिसरातील मेंटल हॉस्पिटल कॅम्पसजवळ विमान कोसळले.
अपघातावेळी एअर इंडियाच्या विमानात 230 प्रवासी आण 12 क्रू मेंबर्स होते.
अपघातामुळे या परिसराला सील करण्यात आले आहे.
विमान उडवणारे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल होते, ज्यांना 8500 तासांचा अनुभव होता.
तर, सह-वैमानिकाला 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता.
 

12 Jun, 25 : 04:00 PM

"विमान अपघाताचं दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही"

अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताचं दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. बचाव पथकांना तातडीनं अपघातस्थळी पाठवण्यात आलं आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली - अमित शाह

12 Jun, 25 : 03:59 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुख्यमंत्र्यांना फोन

विमान अपघाताच्या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी युद्धपातळीवर त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी प्रवाशांना त्वरित उपचार मिळावेत अशीही त्यांनी सूचना केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
 

12 Jun, 25 : 03:53 PM

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे ट्विट


 

12 Jun, 25 : 03:47 PM

"विमानाच्या अपघाताने मी अत्यंत व्यथित झालो"

"अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमानाच्या अपघाताने मी अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, जखमी प्रवाशांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. या विमान अपघाताच्या मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याशी संपर्क साधून एनडीआरएफ पथकांची आणि केंद्र सरकारची संपूर्ण मदत देण्याचे आश्वासन दिले आहे."

12 Jun, 25 : 03:41 PM

विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे महत्त्वाचे निर्देश

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पटेल यांनी मुख्य सचिव पंकज जोशी आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे आदेश दिले, तसेच रुग्णालयांमध्ये उपचारांची सर्व व्यवस्था प्राधान्याने उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.

12 Jun, 25 : 03:36 PM

लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले

12 Jun, 25 : 03:35 PM

विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट

12 Jun, 25 : 03:32 PM

एअर इंडियाने दिली अपघाताबाबत महत्त्वाची माहिती

एअर इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, अहमदाबाद-लंडन गॅटविक ही विमान उड्डाण घेतल्यानंतर फ्लाइट AI171 चा १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आणि मोठी दुर्घटना झाली. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

12 Jun, 25 : 03:29 PM

12 Jun, 25 : 03:28 PM

अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

12 Jun, 25 : 03:26 PM

दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री

विमानामधून एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. तसेच या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते, अशी भीती  सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.  

12 Jun, 25 : 03:26 PM

एअर इंडियाचे अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात कोसळले. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून आगीचे मोठे लोळ उठताना दिसले. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.

Web Title: Air India Ahmedabad Plane Crash Live Updates: London-bound passenger plane carrying more than 240 people crashes after take-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.