सनदी अधिकाऱ्यांचेच घर करायचा लक्ष्य, अखेर चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:01 IST2021-07-12T14:00:37+5:302021-07-12T14:01:06+5:30
संदीपने आत्तापर्यंत मुख्यत्वे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच आपले टार्गेट केल्याचे दिसून येते. संदीपने एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, एक नेव्ही ऑफिसर, एक आयएफएस आणि एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरी चोरी केली होती

सनदी अधिकाऱ्यांचेच घर करायचा लक्ष्य, अखेर चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली येथे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल चोरट्यास अटक केली आहे. विशेष म्हणजे या चोरट्याने आत्तापर्यंत चक्क आयएएस अधिकारी आणि तत्सम सनदी अधिकाऱ्यांच्याच घरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. नवी दिल्ली जिल्हा पोलिसांनी याचा भांडाफोड केला असून करण उर्फ संदीप असं या चोरट्याचं नाव आहे.
संदीपने आत्तापर्यंत मुख्यत्वे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच आपले टार्गेट केल्याचे दिसून येते. संदीपने एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, एक नेव्ही ऑफिसर, एक आयएफएस आणि एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरी चोरी केली होती. खान मार्केट परिसरातील रविंद्र नगर आणि पंडारा रोडवरील निवासस्थानावर वेगवेगगळ्या दिवशी ही चोरी केली होती. या चोरीपूर्वीही त्याने 9 ठिकाणी चोरी केली आहे. चोरी करण्यापूर्वीत तो संबंधित घराची माहिती घेऊन, सद्यस्थितीत घरात कोणी नाही, याची खात्री करुनच आपला चोरीचा डाव साधायचा. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरीच चोरी केल्यानंतर संदीपला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.