AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result | पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने अनेक व्हिडिओ जारी करत टीएमसीचे कार्यकर्ते हिंसाचार करत असल्याचा दावा केला आहे. या हिंसाचारात आपल्या 9 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे भाजपने म्हटले आहे. तसेच टीएमसीचे कार्यकर्ते भाजपच्या लोकांच्या घरावरही हल्ले करत आहेत, असा दावाही भाजपने केला आहे. (AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result)

बंगालमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर एआयएमआयएम प्रमूख आणि हैदराबादमधील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, जीवनाचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे. नागरिकांचे रक्षण करणे हे कुठल्याही सरकारचे आद्य कर्तव्य असायला हवे. मात्र, ते असे करत नसतील, तर ते आपले मूलभूत कर्तव्य पार राडण्यात अयशस्वी ठरत आहेत आणि आपण जीवन रक्षणाच्या बाबतीत कुठल्याही सरकारच्या अपयशाची निंदा करतो. 

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

यापूर्वी, पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चिंता व्यक्त केली आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही म्हटले आहे, की पंतप्रधानांनी मला फोन केला आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेप्रती चिंता व्यक्त केली आहे. तत्पूर्वी, केद्रिय ग्रृहमंत्रालयाने सोमवारी राज्य सरकारकडून हिंसाचारासंदर्भात अहवाल मागविला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळविला आहे. टीएमसी एकूण 292 जागांपैकी 213 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 77 जागाच जिंकता आल्या आहेत. दोन दोन जागा इतरांनी जिंकल्या आहेत.

CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

English summary :
AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.