Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:12 IST2025-06-19T16:11:18+5:302025-06-19T16:12:26+5:30
Ahmedabad Plane Crash : एका आईसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. तिने लेकाला जळताना पाहिलं. १५ वर्षांचा आकाश पटनीचा मृत्यू झाला आहे.

फोटो - ndtv.in
अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये विमानातील २४१ जणांसह हे विमान ज्या इमारतींवर कोसळले तेथील काही जण अशा २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले असून त्याचा आक्रोश मन हेलावून टाकत आहे. याच दरम्यान हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
एका आईसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. तिने लेकाला जळताना पाहिलं. १५ वर्षांचा आकाश पटनीचा मृत्यू झाला आहे. आकाश विमानातही नव्हता आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या परिसरात देखील नव्हता. तरी त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आकाशची आई सीताबेन आयपी कंपाऊंडमध्ये चहाची टपरी चालवते. आकाश त्याच्या आईसाठी जेवणाचा डब्बा घेऊन आला होता.
आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं
शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
आकाशची आई जेवत होती आणि तो समोरच असलेल्या झाडाखाली झोपायला गेला. तो ज्या ठिकाणी झोपला होता तिथे विमानाचा एक भाग पडला. यामध्ये आईसमोरच आकाश जिवंत जळाला आणि आई गंभीररित्या भाजली गेली. सध्या सीताबेन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश अभ्यासात खूप हुशार होता. कुटुंबात सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
अभिनव यांचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे. विवान शुक्रवारी रात्री त्याच्या आईसह लंडनहून भारतात आला. जेव्हा तो लंडनहून निघाला तेव्हा तो भारतात त्याच्या वडिलांना भेटणार असा विचार करून खूप आनंदी झाला होता. पण आठ वर्षांच्या विवानला माहित नाही की त्याचे वडील आता या जगात नाहीत. अभिनव यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी शुक्रवारी संध्याकाळी मुलाला घेऊन अहमदाबादला आली.