अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:58 IST2025-06-12T14:56:06+5:302025-06-12T14:58:31+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले.

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री, सूत्रांची माहिती
गुजरातमधीलअहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले. या विमानामधून एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. तसेच या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते, अशी भीती सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
एअर इंडियाचे अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात कोसळले. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून आगीचे मोठे लोळ उठताना दिसले. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच अहमदाबादमधील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत.