Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
By संतोष कनमुसे | Updated: June 12, 2025 17:08 IST2025-06-12T17:07:19+5:302025-06-12T17:08:17+5:30
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या विमानात २४२ लोक होते.

Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्येएअर इंडियाचे विमान कोसळल्याची माहिती समोर आली. या विमानामध्ये २४२ लोक प्रवास करत होते. विमान अपघातामधील मृतांचा आणि जखमींचा आकडा अजूनही समोर आलेला नाही. दरम्यान, या विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली आहे. या यादीमध्ये दोन मराठी नावांचा समावेश आहे.
अहमदाबाद येथील विमानतळावरुन टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या ८ मिनिटांमध्ये हे विमान विमानतळाच्या सीमेजवळ कोसळले. अपघातस्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. हे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले असून या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी
१.क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर
२.सुमित सबरवाल
३.अपर्णा महाडिक
४.श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1
५.दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2
६.इरफान शेख
७.नंथेम सिंगसेन
८.मैथिली पाटील
९.मनीषा थापा
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी समोर आली असून या यादीमध्ये दोन मराठी नावांचा समावेश आहे. क्रू मेंबरमध्ये मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक या नावांचा समावेश आहे. हे दोन्ही क्रू मेंबर महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. आपर्णा महाडिक या खासदार सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत.
११ वर्षे जुने बोईंग विमान
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ ते कोसळले.
बोईंग 787 ड्रीमलायनरचे डिझाइन केलेले आयुष्य ४४,००० उड्डाण चक्रांचे आहे. ते त्याला ३० ते ५० वर्षांचे संभाव्य आयुष्य देते, तर बहुतेक व्यावसायिक जेट्स तेवढ्या काळासाठी सेवेत राहत नाहीत. अहमदाबादमध्ये अपघात झालेले विमान फक्त साडे अकरा वर्षे जुने होते.
बोईंग 787-8 ड्रीमलायनरचे फिचर
बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे एक वाइड-बॉडी, मध्यम आकाराचे आणि लांब पल्ल्याचे विमान आहे. हे २१०-२५० आसनांसह ८,५०० नॉटिकल मैल पर्यंतचे अंतर कापू शकते. हे २०% कमी इंधन वापरासह डिझाइन केलेले आहे. हे पर्यावरणासाठी देखील चांगले आहे.