भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:58 IST2025-06-17T14:57:28+5:302025-06-17T14:58:29+5:30

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान कोसळल्यानंतर, जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी कशा प्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दिसत आहे. 

ahmedabad plane crash Horrifying moment Students jump from hostel balcony as plane crashes, heart-stopping new VIDEO | भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO

भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO


गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान १२ जूनला कोसळले होते. हे विमान अहमदाबाद एअरपोर्टजवळ बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टलच्या इमारतीला धडकले. या भीषण विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला. विमान हॉस्टेलला धडकल्याने अनेक विद्यार्थीही या अपघाताचे बळी ठरले. आता या घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान कोसळल्यानंतर, जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी, आपला जीव वाचवण्याचा  कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये, MBBS चे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून कपडा बांधून कशा प्रकारे खाली उतण्याचा प्रयत्न करत आहेत? हे विद्यार्थी चादरीच्या सहाय्याने उड्या मारताना दिसू शकतात.

असे सुखरूप बाहेर आले विश्वकुमार रमेश -
या विमानात असलेल्या २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या भयावह विमान अपघातातून केवळ विश्वकुमार रमेश नावाचा एक प्रवासीच वाचू शकला. सोमवारी या अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. यात विमान जळत असताना आणि धुराचे मोठे लोट उठलेले असतानाच विश्वकुमार रमेश त्या धुराच्या लोटातून बाहेर येताना दिसत होते.

Web Title: ahmedabad plane crash Horrifying moment Students jump from hostel balcony as plane crashes, heart-stopping new VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.