Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:02 IST2025-06-13T13:01:52+5:302025-06-13T13:02:28+5:30
Ahmedabad Plane Crash Black Box: या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
Air India Plane Crash Black Box: अहमदाबादमधीलविमानअपघातात आतापर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात बसलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुदैवाने एक प्रवासी बचावला आहे. मृतांपैकी २२९ प्रवासी होते, तर १२ क्रू मेंबर होते. याशिवाय ज्या मेडिकल कॉलेज-हॉस्टेलवर विमान कोसळले, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ५६ जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, विमान अपघाताची चौकशी तीव्र करण्यात आली आहे. सरकारने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
अहदमाबाद विमानतळावरुन टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानात ऐनवेळी काय तांत्रिक बिघाड झाला? वैमानिकाला विमान नियंत्रणात का आणता आले नाही? अखेरच्या क्षणाला विमानात नेमकी काय परिस्थिती होती? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.
गुजरात अपघातग्रस्त विमानतला ब्लॅक बॉक्स एनएसजीच्या ताब्यात..#LokmatNews#AhmedabadPlaneCrash#gujrat#MarathiNews#blackboxpic.twitter.com/xmNZkxlSgC
— Lokmat (@lokmat) June 13, 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज ढिगाऱ्यात बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडले आहे. त्यामुळे लवकरच अपघाताचे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदींचा अहमदाबाद दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हेदेखील होते. तर, गृहमंत्री अमित शाहा यांनी कालच घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
#WATCH | Prime Minister Narendra Modi holds a review meeting with the officials at the airport in Ahmedabad in the wake of yesterday's #AirIndiaPlaneCrash.
(Source - DD) pic.twitter.com/V9M0B5RDsb— ANI (@ANI) June 13, 2025
अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींची बैठक
त्यानंतर विमान अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेतला आणि पुढील कृती आराखड्यावर चर्चादेखील केली.