MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:23 IST2025-06-12T17:12:01+5:302025-06-12T17:23:29+5:30
What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात...

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळ्याची मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानत क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. विमानानं अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या काहीच मिनिटांत ते खाली कोसळलं. पण त्याही परिस्थितीत वैमानिकानं MAYDAY कॉल दिला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी गडबड आहे याची कल्पना वैमानिकाला आली होती. हाच MAYDAY कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात...
अहमदाबाद विमान दुर्घटनेआधी वैमानिकाने अपघाताच्या काही सेकंद आधी एटीसीला (एअर ट्राफिक कंट्रोल) MAYDAY कॉल दिला होता. हवाई क्षेत्रातील प्रवासी वाहतूक परिभाषेत MAYDAY कॉल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असा संकटाचा कॉल आहे. जो आपत्कालीन परिस्थितीचा सिग्नल म्हणून दिला जातो.
MAYDAY कॉल केव्हा दिला जातो?
हा एक रेडिओद्वारे दिला जाणारा सिग्नल आहे, जो खूप गंभीर परिस्थितीत, जीवाला धोका असल्यास वापरला जातो. तो तीन वेळा दिला जातो. कारण यामुळे स्पष्ट होतं की हा विनोद किंवा चुकीचा कॉल नाही, तर खरी आपत्ती आहे. हा कॉल पुढील गंभीर परिस्थितींमध्ये दिला जातो.
१. विमान किंवा जहाज अपघाताच्या उंबरठ्यावर असेल
२. इंधन संपण्याची स्थिती
३. इंजिन फेल होणे
४. हवामान खराब होऊन विमानाचे नियंत्रण गमावणे
५. आग लागणे
६. प्राणघातक वैद्यकीय आपत्ती
७. दहशतवादी हल्ला किंवा विमान अपहरण
MAYDAY कॉलचा उद्देश काय?
MAYDAY कॉलचा उद्देश हा जवळच्या ATC (Air Traffic Control) किंवा नौदल नियंत्रणेला लगेच सतर्क करणे असा असतो. जेणेकरुन तातडीने मदत मिळावी. जसे की रेस्क्यू टीम, अग्निशमन दल आणि इतर तांत्रिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचाव्यात यासाठी या कॉलची मदत होते. यासोबत त्या परिघात इतर विमानांच्या वाहतूक रोखण्यासाठीही अलर्ट या माध्यमातून मिळतो.
अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
अहमदाबाद दुर्घटनेत वैमानिकाने दिलेला कॉल
अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानात क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफीसर होते. तर सुमित सबरवाल आणि अपर्णा महाडिक हे सहकारी क्रू होते. एअर ट्राफिक कंट्रोलला MAYDAY कॉल दिला गेला होता. पण हा कॉल दिल्याच्या पुढच्याच सेकंदात विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी बिघाड झाल्यानं ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.