शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; "आरोपीनं घेतली काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं, कमलनाथांच्या मुलाचाही समावेश"

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 18, 2020 1:00 PM

जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना 2019मध्ये दुबई येथून प्रत्यार्पन प्रक्रियेने भारतात आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीदरम्यान काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत.यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी शिवाय त्यांचा मुलगा बकुल नाथ यांचाही समावेश आहे.जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीदरम्यान काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत. यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी शिवाय त्यांचा मुलगा बकुल नाथ यांचाही समावेश आहे. मात्र, आपल्या मुलाचा या प्रकरणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असे स्पष्टिकरण कमलनाथ यांनी दिले आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आरोपी राजीव सक्सेना यांनी सलमान खुर्शीद आणि अहमद पटेल या मोठ्या नेत्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना 2019मध्ये दुबई येथून प्रत्यार्पन प्रक्रियेने भारतात आणण्यात आले आहे. ईडीने त्यांची 385 कोटी रुपयांची संपत्ती अॅटॅच केली होती. तसेच यानंतर त्यांची चौकशी केली होती. 

चौकशीत 'एपी'चा उल्लेख -इंडियन एक्सप्रेसकडे राजीव सक्सेना यांचे 1000 पाणांचे निवेदन आहे. जे त्यांनी ईडीसमोर दिले आहेत. सक्सेना यांनी ईडीला  सांगितले, की आरोपी डिफेंस डीलर सुशेन मोहन गुप्ता यांची कंपनी इंटर्सटेलर टेक्नॉलजीजच्या माध्यमाने ऑगस्टा  वेस्टलँडकडून अवैध पैसा आला आहे. गौतम खेतान हे सुशेन मोहन गुप्ता यांच्या मार्फत ही कंपनी चालवतात. इडीने सुषेण मोहन गुप्ता आणि गौतम खेतान या दोघांनाही अटक केली आहे. सध्या हे दोघेही जामिनावर आहेत.

सक्सेना यांनी म्हटले आहे, सुषेण मोहन गुप्ता आणि गौतम खेतान हे चर्चेदरम्यान घोटाळ्याचा लाभ घेणाऱ्या राजकारण्यांत 'एपी'चेही नाव घेत होते. सक्सेना यांच्या मते, 'एपी'चा वापर अहमद पटेल यांच्यासाठी करण्यात येत होते. याशिवाय, त्यांनी सत्तेतील आपला रुतबा दाखवण्यासाठी राजकारणातील मोठ्या नेत्यांची नावे घेतली. त्यांनी अनेक वेळा सलमान खुर्शीद आणि कमल चाचांचा उल्लेख केला. हा उल्लेख माझ्यामते कमलनाथ यांच्यासाठीच होता.

कमलनाथांनी आरोप फेटाळले -यासंदर्भात बोलताना कमलनाथ म्हणाले, रतुल पुरी यांच्या कंपन्या आणि व्यवहारांशी त्यांचा काहीही संबंध नाही. माझा मुलगा बकुलनाथ हा दुबईचा एनआरआय आहे. ते म्हणाले, या कंपनीसंदर्भात मला काहीही माहीत नाही. तसेच या कंपनीशी आपले संबंध असल्याचे सिद्ध होईल, असे दस्तऐवजही नाहीत. एक ऑफशोअर खाते उघडून कुणीही कुठल्याही बेनिफिशरी ओनरचे नाव टाकू शकते. खुर्शीद यांनी आरोप फेटाळले -ऑगस्टा वेस्टलँडच्या चौकशीत आपले नाव घेतले गेले याचे आश्चर्य वाटते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. सुशेन मोहन यांचा मुलगा देव मोहन आमचे मित्र आहेत आणि मी त्यांचा शुभचिंतक आहे. मी जेवढे ओळखतो, त्यावरून त्यांचा रतुल पुरी अथवा राजीव सक्सेना यांच्याशी काही संबंध असेल, असे मला वाटत नाही, असेही खुर्शीद यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Agusta Westland Scamअगुस्ता वेस्टलँड घोटाळाcongressकाँग्रेसsalman khurshidसलमान खुर्शिदAhmed Patelअहमद पटेल