शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 10:32 AM

Independence Day 2020 : कोरोनावरील औषध कधी येणार, देशातील नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार आदी बाबींवर मोदी यांनी भाष्य केले. याचबरोबर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा केली.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी यांनी आज सातव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. असे करणारे नरेंद्र मोदी बिगर काँग्रेसी पहिलेच पंतप्रधान बनले आहेत. यावेळी मोदी यांनी मुलींच्या लग्नाचे वय बदलण्यावरही मोठे संकेत दिले आहेत. 

कोरोनावरील औषध कधी येणार, देशातील नागरिकांपर्यंत कधी पोहोचणार आदी बाबींवर मोदी यांनी भाष्य केले. याचबरोबर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची घोषणा केली. यावेळी मोदी यांनी नारीशक्तीला सलाम करत मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत सरकार विचार करत असून समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. 

देशात जी 40 कोटी जनधन खाती सुरु झाली आहेत त्यापैकी 22 कोटी खाती ही महिलांची आहेत. कोरोना काळात महिलांच्या खात्यांवर एप्रिल, मे, जूनमध्ये जवळपास 30 हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. आज महिला कोळसा खाणींसह लढाऊ विमानांद्वारे यश मिळवत आहेत. भारतीय महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचे सोने केले आहे. नोकरदार गर्भवती महिलांसाठी भरपगारी 6 महिन्यांची सुटी देण्यात आली आहे. तिहेरी तलाकमुळे महिला त्रस्त होत्या, त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गरीब मुलींच्या आरोग्याची चिंताही सरकारला आहे, असे मोदी म्हणाले. 

लालकिल्ल्यावरून मोदींनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली. या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार असून त्याद्वारे त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले, कोणती औषधे दिली, त्याला असलेले आजार, डॉक्टरांनी केलेले निदान आदी माहिती ठेवली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. मध्यमवर्गीयांसाठी ही योजना फायद्याची असणार असल्याचे ते म्हणाले. 

कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडलाय. तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन तयार आहे. शेतकरी बंधनमुक्त झाला. देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. कामगारांसाठी शहरांमध्ये राहण्याची योजना राबविणार. पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल, विविध क्षेत्रात 7 हजार प्रकल्पांची निवड केली आहे. चार लेनचे हायवे बनविण्यासाठी काम करणार आहोत. परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली असे मोदी यांनी सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा

आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन