शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

बँकेच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, प्रियंका म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 1:30 PM

सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते.

मुंबई - येस बँकेतील व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्थगिती आणली आहे. ग्राहकांना त्यांच्या येस बँकेतील खात्यातून येत्या ३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या बँकेशी व्यवहार करणाऱ्या हजारो खातेदारांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांना बँकांचा फटका सातत्याने बसत असल्याने, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

येस बँकेचे ग्राहक असलेल्या नागरिकांना 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढता येऊ शकत नाही. बँकेच्या निर्बंधामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. येस बँकेच्या डबघाईनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन सर्वसामान्य नागरिकांचं दु:ख मांडताना, बँकांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते. उत्तर प्रदेशमधील या शेतकऱ्याने बँकेसमोरच आपली जीवनयात्रा संपवली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र हीच परिस्थिती आहे, लहान व कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही बँकेकडून त्रास दिला जातोय, असे प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. तसेच, भाजपा सरकारकडून खोट्या कर्जमाफीचा ढोल वाजविण्यात येत आहे. आता, या कुटुंबासाठी भाजपाकडे काय उत्तर आहे? असा प्रश्नही प्रियंका गांधींनी विचारला आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर देशातील बँकांच्या परिस्थितीवर प्रियंका यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे धनदांडगे लोकं, उद्योजक बँकांना लुबाडत आहेत. तर, दुसरीकडे सर्वसामान्य माणसांना बँकांकडून मोठा त्रास सहन करावा लागतोय, हेच प्रियंका यांनी सूचवलंय. 

   

दरम्यान, येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आता येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून येस बँकेने ही माहिती दिली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे ३० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास  कपूर यांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yes Bankयेस बँकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcorona virusकोरोनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या