शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:18 IST2025-08-25T06:18:01+5:302025-08-25T06:18:41+5:30

Congress MLA H D Rangnath: कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले.

After Shivakumar, Congress MLA H D Rangnath also sang RSS song | शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत

शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत

तुमकूरू - कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचेआमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आरएसएसचे गीत गायले होते. त्याच धर्तीवर रंगनाथ यांनी तुमकूरू जिल्ह्यातील कुनीगल येथे पत्रकारांशी बोलताना ‘नमस्ते सदा वत्सले’या गीताच्या सुरुवातीच्या ओळी गायल्या. 

आमची पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि चांगल्या गोष्टी कुणाकडूनही स्वीकारल्या पाहिजेत, असे रंगनाथ म्हणाले. भाजपवर टीका करताना ते पुढे म्हणाले, उजव्या विचारसरणीचे लोक जात-धर्माचे भेद निर्माण करण्यावर भर देतात, त्याला आम्ही विरोध करतो. त्यांची विचारसरणी आमच्याशी कधीच जुळू शकत नाही. पण कुणी आरएसएसचे गीत गायले तर त्यात काय चुकीचे आहे? 

Web Title: After Shivakumar, Congress MLA H D Rangnath also sang RSS song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.