राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भावना अनावर; म्हणाले, पक्षाने माझ्यावर शंका घेतली, आता....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 06:37 PM2021-09-18T18:37:35+5:302021-09-18T18:45:44+5:30

Amrinder Singh Resignation: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे.

After the resignation, Amarinder Singh felt emotional; Said, the party doubted me | राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भावना अनावर; म्हणाले, पक्षाने माझ्यावर शंका घेतली, आता....

राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भावना अनावर; म्हणाले, पक्षाने माझ्यावर शंका घेतली, आता....

Next

चंदिगड - कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली आहे. अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अवमान होत असल्याचे सांगितले. अमरिंदर सिंग म्हणाले, पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे. (After the resignation, Amarinder Singh felt emotional; Said, the party doubted me )

कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले की, असे वाटते की, पक्षाला माझ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मी सकाळीच ठरवले की, मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे. आता पक्षाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला त्यांनी मुख्यमंत्रि बनवावे.   आता भविष्यातील राजकारणाबाबत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी निर्णय घेईन. सध्यातरी मी काँग्रेसमध्ये आहे. आता सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेईन. 

कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या वृत्ताला त्यांच्या मुलाने दुजोरा दिला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू होता. अखेर आता त्याचा शेवट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याने झाला आहे. आता प्रसारमाध्यमांममध्ये येत असलेल्या वृत्तानुसार पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील जाखड, खासदार रवनीत सिंग बिट्टू आणि प्रताप सिंग बाजवा यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.  

English summary :
After the resignation, Amarinder Singh felt emotional; Said, the party doubted me

Web Title: After the resignation, Amarinder Singh felt emotional; Said, the party doubted me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app