शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

भिंद्रानवालेचे पोस्टर काढल्याने जम्मू पेटले

By admin | Updated: June 4, 2015 23:33 IST

दोन हजारावर शीख तरुण आणि पोलिसांदरम्यान गुरुवारी झालेल्या चकमकीत एक युवक ठार तर दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले.

जम्मू : जम्मूतील एका भागात खलिस्तानवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रानवालेचे पोस्टर काढून टाकल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणारे दोन हजारावर शीख तरुण आणि पोलिसांदरम्यान गुरुवारी झालेल्या चकमकीत एक युवक ठार तर दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले. या घटनेनंतर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान काही युवकांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जूनला भिंद्रानवालेचा मृत्युदिन आहे. त्यानिमित्त शीख समुदायातील एका संघटनेतर्फे ठिकठिकाणी त्याचे पोस्टर लावण्यात आले होते. प्रशासनाने हे पोस्टर्स हटविल्याने कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. लाठ्याकाठ्या आणि कृपाणधारी शेकडो युवक सतवारी आर.एस. पुरा मार्गावर जमा झाले आणि त्यांनी वाहतुकीची कोंडी केली. जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. याच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले. या चकमकीत एक युवक ठार तर सहा जण जखमी झाले. दोन पोलीस दगडफेकीत जखमी झाले. परंतु युवकाचा मृत्यू गोळी लागून झाल्याचे इस्पितळातील सूत्रांचे म्हणणे आहे.पोलीस आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत काही शीख युवकांनी सतवारीमध्ये जम्मू-पठाणकोट महामार्गावर रास्तारोको करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचेही वृत्त आहे. जम्मूत भिंद्रानवालेचे पोस्टर्स लावण्याचा प्रकार प्रथमच घडतो आहे. (वृत्तसंस्था)