राफेलनंतर आता S-400! रशियासोबत १०,००० कोटींची डील फायनल; पाकिस्तानला '४०० किमी' दूरच रोखण्याची भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:06 IST2026-02-13T09:43:09+5:302026-02-13T10:06:46+5:30

भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत शस्त्रास्त्र खरेदीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी फ्रान्सकडून ११४ राफेल विमानांची खरेदी सर्वात महत्त्वाची होती. याव्यतिरिक्त, अमेरिकेकडून सहा पी-८आय टोही विमानांच्या खरेदीला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे S-400 संरक्षण प्रणालीसाठी २८८ क्षेपणास्त्रांच्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली.

After Rafale, now S-400! Rs 10,000 crore deal with Russia finalised; India ready to stop Pakistan '400 km away' | राफेलनंतर आता S-400! रशियासोबत १०,००० कोटींची डील फायनल; पाकिस्तानला '४०० किमी' दूरच रोखण्याची भारताची तयारी

राफेलनंतर आता S-400! रशियासोबत १०,००० कोटींची डील फायनल; पाकिस्तानला '४०० किमी' दूरच रोखण्याची भारताची तयारी

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने गुरुवारी अनेक प्रमुख संरक्षण करारांना मंजुरी दिली. यामध्ये फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करणे आणि इतर अनेक निर्णयांचा समावेश होता. जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली, S-400 बाबतही एक मोठा निर्णय घेण्यात आला. भारतानेरशियाकडून S-400 प्रणालीसाठी १०,००० कोटी खर्चाच्या २८८ क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने S-400 ची शक्ती पाहिली. 

या क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे S-400 च्या क्षमता आणखी धारदार होतील. बैठकीत अमेरिकेकडून सहा P-8I टोही विमानांच्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली, हा करार सुमारे ३०,००० कोटींचा असल्याचा अंदाज आहे.

पुढील ५ वर्षांत भारत ५०० अब्ज डॉलर किमतीची अमेरिकी उत्पादनांची खरेदी करणार; ट्रम्प यांचा दावा

गेल्या वर्षीच्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, पाकिस्तानी विमानांवर आणि लक्ष्यांवर असंख्य S-400 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. त्यामुळे, स्ट्रायटममध्ये घट झाली आहे. त्यामुळे, ही उणीव भरून काढण्यासाठी हा करार मंजूर करण्यात आला आहे. S-400 शस्त्रागारात लांब आणि लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची संख्या वाढवण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे. गुरुवारी दिलेल्या मंजुरीसह, 120 कामी पल्याच आणि 168 लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे खरेदी केली जातील. ही खरेदी जलदगतीने केली जाईल. सरकारची मंजुरी अशा वेळी आली आहे जेव्हा भारताला या वर्षी जून आणि नोव्हेंबरमध्ये रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणालीचे दोन स्क्वॉड्रन मिळतील.

आणखी ५ S-400 स्क्वॉड्रनची तयारी

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान S-400 च्या यशाने भारतीय लष्कर उत्साहित आहे. या संरक्षण प्रणालीच्या आणखी पाच स्क्वॉड्रन खरेदी करण्याची शिफारस ते करत आहेत. रशियाकडून पॅंटसिर शॉर्ट-रेंज सिस्टम खरेदी करण्याबाबतही लष्कर चर्चा करत आहे. जर हा करार झाला तर भविष्यात भारताकडे १० S-400 स्क्वॉड्रन असतील, S-400 आणि पॅंटसिर क्षेपणास्त्र प्रणाली दोन-स्तरीय संरक्षण प्रणाली तयार करतील. पॅंटसिर संरक्षण प्रणाली कामिकाझे ड्रोनपासून संरक्षण करते. संरक्षणमंत्र्यांनी अंदाजे ३.६० लाख कोटी किमतीच्या संरक्षण प्रस्तावांना मंजुरी दिली.

अहवालानुसार, S-400 साठी खरेदी केल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये 400 किमी, 200 किमी, 150 किमी आणि 40 किमीच्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे असतील. ही सर्व जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400 च्या क्षेपणास्त्रांनी 314 किमी खोलवर हल्ला केला. यामुळे पाकिस्तानला रावळपिंडी येथून आपला हवाई तळ हलवावा लागला.

Web Title : भारत ने रूस के साथ एस-400 मिसाइल सौदा किया; रक्षा मजबूत।

Web Summary : भारत ने रूस से एस-400 मिसाइलें खरीदने के लिए ₹10,000 करोड़ के सौदे को मंजूरी दी, जिससे उसकी हवाई रक्षा क्षमताएं बढ़ेंगी। खरीद में अलग-अलग रेंज की 288 मिसाइलें शामिल हैं। यह 'ऑपरेशन सिंदूर' के दौरान एस-400 की सफलता के बाद आया है, जिससे अधिक अधिग्रहण और दो-स्तरीय रक्षा प्रणाली की योजना बन रही है।

Web Title : India finalizes S-400 missile deal with Russia; Boosts defense.

Web Summary : India approved a ₹10,000 crore deal to buy S-400 missiles from Russia, enhancing its air defense capabilities. The purchase includes 288 missiles with varying ranges. This follows the success of S-400 during 'Operation Sindoor,' prompting plans for more acquisitions and a two-tiered defense system.