शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 16:06 IST

मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी; मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला

ठळक मुद्दे आज सकाळीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातले मतभेद वारंवार समोर आले आहेत. एकूण 200 आमदारांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे एकूण 112 आमदारांचा पाठिंबा आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आज सकाळीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्री अमित शहादेखील त्यांच्या सोबत होते. यानंतर सिंधिया तिथून अमित शहा यांच्या कारमधून निघाले. आज संध्याकाळी ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

मध्य प्रदेशमधील नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. या भूकंपाचे झटके मध्य प्रदेशाला लागून असलेल्या राजस्थानमधल्या काँग्रेस सरकारला बसण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. राजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेस नेतृत्व कामाला लागलं आहे. रिपब्लिक टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया यांनी गेहलोत यांना दिल्लीला येण्याचे आदेश दिले होते.

'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेदराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातले मतभेद राज्यसभेच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा समोर आले आहेत. हिरे व्यापार क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या राजीव अरोरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह मुख्यमंत्री गेहलोत यांनी धरला आहे. मात्र याला उपमुख्यमंत्री पायलट यांचा विरोध आहे. पायलट यांनी काल संध्याकाळीच मध्य प्रदेशातल्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं ट्विट केलं. तेव्हापासून काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. 

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातले मतभेद वारंवार समोर आले आहेत. कोटामधल्या शासकीय रुग्णालयात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंबद्दल पायलट यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलू नये यासाठी काँग्रेस नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत.

एकूण 200 आमदारांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे एकूण 112 आमदारांचा पाठिंबा आहे. सीपीएमच्या 3, तर राजद आणि बसपाच्या प्रत्येकी एका आमदाराने सरकारला पाठिंबा दिला आहे. भाजपकडे 80 आमदार आहेत. त्यामुळे 20 आमदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यास राजस्थान काँग्रेसच्या हातून जाऊ शकतं.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीdelhiदिल्लीRajasthanराजस्थानChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश