शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता गमावल्यानंतर यादव कुळाला उपरती

By admin | Updated: March 13, 2017 00:56 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांमध्ये झालेल्या मानापमान नाट्याने उभी फूट पडलेल्या समाजवादी पक्षास

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांमध्ये झालेल्या मानापमान नाट्याने उभी फूट पडलेल्या समाजवादी पक्षास दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर यादव कुळाला आता उपरती झाल्याची चिन्हे असून झाले गेले विसरून जाऊन या दोघांनी पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.अखिलेश आणि मुलायम सिंग या दोघांनी मिळून रविवारी समाजवादी पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेतली पक्षाची उभारणी करण्यासाठी पुन्हा लोकांमध्ये जाण्याचे आवाहन केले.वडिलांच्या उपस्थितीत अखिलेश कार्यकर्त्यांना म्हणाले की, समाजवादी पक्ष हा केवळ एक पक्ष नाही. तो एक विचार आहे. तो विचार घेऊन आपल्याला पुन्हा लोकांकडे जावे लागेल.येत्या आठवड्यात पक्षाच्या नवविर्वाचित आमदारांची आणि निवडणूक जिंकू शकलेल्या उमेदवारांची बैठक घेऊन पक्षाचे यापुढील धोरण ठरविले जडाईल, असेही अखिलेश म्हणाले.त्याआधी इटावा येथे बोलताना मुलायम सिंग यांनी निवडणुकीतील पराभवाचे खापर (एकट्या) अखिलेश यांच्या माथी फोडणे योग्य होणार नाही, असे सांगितले. मुलायम सिंग म्हणाले की, हा पक्षाचा पराभव आहे व यासाठी सर्वच जण जबाबदार आहेत. पक्षाने जनादेश म्हणून याकडे पाहायला हवे. जनतेला आमच्याकडे वळविण्यात आम्हीच कमी पडलो. याची जबाबदारी सर्वांवरच आहे.शनिवारी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अखिलेश यांनी काहीशा तिरकसपणे पराभवासाठी राज्याच्या जनतेला दूषण दिले होते. परंतु मुलायम यांनी तसे केले नाही. मात्र अखिलेश यांच्याप्रमाणे तेही म्हणाले की, भाजपाने राज्याच्या जनतेला वारेमाप आश्वासने दिली आहेत. पाहू या त्यापैकी किती आश्वासने ते पूर्ण करतात!निवडणुकीआधीच्या पिता-पुत्राच्या भांडणात अखिलेश यांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले त्यांचे चुलते शिवपाल यादव यांनाही वास्तवाने भानावर आणल्याचे दिसते. स्वत: शिवपाल मैनपुरी जिल्ह्यातील जसवंतनगरमधून निवडून आले असले तरी घरातील भांडणाने पक्षाची कशी वासलात झाली. (प्रतिनिधी)