after the kerala elephant insident miscreants gave explosion to cow in himachal pradesh | निर्दयतेचा कळस : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना हिमाचलमध्ये; गाईला खायला दिली स्फोटकं

निर्दयतेचा कळस : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना हिमाचलमध्ये; गाईला खायला दिली स्फोटकं

ठळक मुद्देया घटनेत गाईचा जबडा फाटला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.गाईला झालेल्या  जखमेचा व्हिडिओ तयार करून तिच्या मालकाने प्रशासनाला मदत मागितली आहे.संबंधित घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

विलासपूर : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना आता हिमाचल प्रदेशात समोर आली आहे. येथील विलासपूरमध्ये एका गर्भवती गाईला अज्ञात व्यक्तीने स्फोटके खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत गाईचा जबडा फाटला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे प्रकरण झंडूता भागात घडले. सांगण्यात येते, की एका शेतात चरत असताना एका गर्भवती गाईच्या तोंडात स्फोट झाला आणि तिचा जबडा फाटला. गाईला झालेल्या  जखमेचा व्हिडिओ तयार करून तिच्या मालकाने प्रशासनाला मदत मागितली आहे. या व्हिडिओमध्ये स्फोटामुळे गाईचा फाटलेला जबडा दिसत आहे.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

गाईच्या मालकाने केली कारवाईची मागणी -
असे निर्दयी कृत्य केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, गाईचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. एवढेच नाही, तर हे कृत्य त्यांचा शेजारी नंदलाल यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

पोलिसांनी गुन्हा नोंदवला -
संबंधित घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. गुरदयाल यांच्या तक्रारीवरून प्राण्यांसदर्भातील  क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे.

सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: after the kerala elephant insident miscreants gave explosion to cow in himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.