शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमधील घुसखोरीनंतर आता पँगाँग सरोवराजवळ चिनी सैनिकांनी केले असे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:58 IST

भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देपँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला आहेतिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहेचिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे.  याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे.

लेह (लडाख) - लडाखमध्ये चिनी सैनिकांकडून सातत्याने चाललेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात चिनी सैनिकाशी झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र असे असले तरी नियंत्रण रेषेवर असलेल्या चिनी सैन्याकडून रोज नव्या उचापती सुरू आहेत.

पँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला असून, तिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहे. चिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे.  याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे. तसेच ही चिन्हे एवढी मोठी आहेत की, ती सॅटेलाइट फोटोमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहेत. दरम्यान, तिबेटमध्ये असलेले चिनी सैन्याचे ओव्हरऑल कमांडर वँग हायजँग यांचा एक फोटो नुकताच समोर आला होता. त्या ते भारत आणि चीनच्या सीमेवर लिहिलेले चीनचे नाव रंगवताना दिसत होते.  

लडाखमधील पँगाँग सरोवरामधून भारत आणि चीनची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. या सरोवराला लागून असलेल्या फिंगर १ ते ८ पर्यंत आपला हक्क आहे असा भारताचा दावा आहे. तर चीन हल्ली फिंगर आठ ते चार पर्यंत आपला दावा सांगू लागला आहे. तसेच सध्या फिंगर ४ जवळ दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आलेले आहे. येथेच मे महिन्यामध्ये चिनी सैन्य आणि भारताच्या जवानांमध्ये झटापटी झाल्या होत्या. त्यावेळी चिनी सैनिकांनी काटेरी तारा गुंडाळलेले रॉड आणि सळ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता.  

सध्या फिंगर ४ पर्यंत चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असून, त्यांच्याकडून भारतीय जवानांना फिंगर आठपर्यंत गस्त घालण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच या भागात चिनी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर स्थायी आणि अस्थायी बांधकाम झाल्याचे छायाचित्रांमधून दिसत आहे.  

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन