उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका गावात मधुचंद्राच्या रात्रीच एक मोठा राडा झाला. नवऱ्याने चक्क प्रेग्नन्सी टेस्ट किट दिल्याने नवरीबाई संतापली आणि तिने तात्काळ माहेरच्यांना फोन लावला. आपल्या वहिनीला तिने सगळी हकीकत सांगितली आणि घरच्यांना सासरवाडीला बोलावून घेतलं. झालं असं की, लग्नानंतर सासरवाडीत पोहोचताच नवरीला चक्कर आली आणि ही गोष्ट नवरदेवाने आपल्या मित्रांना सांगितल्यावर त्यांनी त्याला प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची सल्ला दिला होता.
चक्कर येताच नवरदेवाला आला संशयमीडिया रिपोर्ट्सनुसार, एका तरुणाचं लग्न शनिवारी मोठ्या थाटामाटात झालं. वरात परतल्यावर सायंकाळी नवरी सासरवाडीत पोहोचली. लग्नाचा थकवा, उष्णता आणि दमट वातावरणामुळे नवरीला चक्कर आली, असं सांगितलं जातंय. हे पाहून नवरदेव घाबरला. त्याने लगेच आपल्या काही मित्रांशी संपर्क साधला, ज्यांनी त्याला मस्करीत सांगितलं की, 'हे गरोदरपणाचं लक्षण असू शकतं!' याच गैरसमजुतीतून नवरदेवाने रात्रीच गावातील एका ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून प्रेग्नन्सी टेस्ट किट विकत आणली आणि ती पत्नीला दिली.
टेस्ट किट पाहताच नवरीचा पारा चढलालग्नाच्या रात्री नवऱ्याने जशी ती किट नवरीला दिली आणि टेस्ट करायला सांगितली, तसा तिचा पारा चढला. कोणताही विचार न करता तिने लगेच आपल्या वहिनीला फोन केला आणि सांगितलं की, 'माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय आणि म्हणतोय की माझं कुणाशीतरी आधी संबंध होते.' वहिनीने या गोष्टीला गांभीर्याने घेतलं आणि संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. काही वेळातच नवरीकडचे लोकही सासरवाडीत पोहोचले.
दोन तास चालली पंचायतमुलीकडचे लोक येताच नवरदेवाच्या कुटुंबीयांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली. प्रकरण अधिक बिघडण्याआधीच गावातील काही लोकांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही पक्षांना समजावून शांत केलं. गावकऱ्यांची पंचायत बोलावण्यात आली. सुरुवातीला बराच गदारोळ झाला. नवरी आपल्या मतावर ठाम होती की, नवऱ्याने तिच्यावर संशय घेतला आहे, अशा परिस्थितीत हे नातं पुढे कसं जाणार? दुसरीकडे, नवरदेवाने स्पष्टीकरण दिलं की, 'हे सगळं त्याने कोणत्याही वाईट हेतूने केलं नसून, चुकून घडलं आहे.'
नवरदेवाने माफी मागितल्यावर शांत झाले सर्वजणदोन्ही बाजूचे लोक पंचायतीत आपापली बाजू मांडत राहिले. शेवटी नवरदेवाने आपली चूक मान्य करत नवरी आणि तिच्या कुटुंबीयांची माफी मागितली. त्याने पंचायतीत सर्वांसमोर सांगितलं की, 'तो यापुढे असं कोणतंही वर्तन करणार नाही.' आपल्या मित्रांनी त्याला कशी चुकीची सल्ला दिली आणि त्याने अजाणतेपणी ते कसं खरं मानलं, हेही त्याने सांगितलं.