शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:02 AM

नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्याचा देशभरात जो खेळ झाला त्यातील गैरप्रकार आता उजेडात येत आहेत.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्याचा देशभरात जो खेळ झाला त्यातील गैरप्रकार आता उजेडात येत आहेत. अशा नोटांच्या अदलाबदलीमध्ये संशयास्पद व्यवहार केल्याबद्दल कॅबिनेट सचिवालयात पाच वर्षे सेवा बजावलेल्या कॉन्स्टेबल पदावरील राहुल रथरेकर यांना जून २०१७मध्ये सेवेतून दूर करण्यात आले होते असे या सचिवालयाच्या एका निवेदनातच म्हटले आहे.या गोष्टीमुळे खळबळ माजली आहे. नोटाबंदीसंदर्भातकाँग्रेसने ९ एप्रिल रोजी जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये हेच राहुल रथरेकर सर्वांना दिसले होते. बंदी घातलेल्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या कामात देशातील २६ ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते व निकटवर्तीय, सरकारी कर्मचारी, बँक अधिकारी यांच्या संगनमताने गैरप्रकार घडले होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता. स्टिंग आॅपरेशन करून हा व्हिडीओ बनविण्यात आला होता.भाजपचे गुजरातमधील कार्यालय व त्या पक्षाशी संबंधित लोक हे नोटा अदलाबदलीचा व्यवसाय करत असल्याचे काँग्रेसने २६ मार्च रोजी झळकविलेल्या एका व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले होते. काँग्रेसने बुधवारी आणखी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात काही धक्कादायक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. आकाशी रंगाचे जाकिट घातलेला व भाजपशी संबंधित असलेली एक व्यक्ती त्या पक्षाच्या कार्यालयातून बाहेर येऊन स्वत:च्या कार्यालयात जाते. याचवेळी जाकिट घातलेल्या व्यक्तीला भाजप मुख्यालयातून दूरध्वनी येतो. जाकिटधारी समोरच्याला सांगतो की, विशिष्ट कमिशन दिल्यास तुमच्याकडे असलेल्या पाचशे, हजारच्या बंदी घातलेल्या नोटा बदलून त्याबदल्यात तितक्याच किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा देऊ. एका खोलीत २ हजार रुपयांच्या बंडलांचा ढीग रचला असल्याचे दृश्यही या व्हिडिओत पाहायला मिळते. ती ५० हजार कोटी रुपयांची रोख रक्कम असावी.हा मुद्दा काँग्रेसने पूर्वीच उपस्थित केला असला तरी राहुल रथरेकर यांच्याबाबतच्या कॅबिनेट सचिवालयाच्या निवेदनामुळे या पक्षाने भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारला आठ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे द्यावीत अशी मागणीही केली आहे.सिब्बल यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर जुन्या नोटांची अवैधरित्या अदलाबदली करणाऱ्यांवर गुन्हे का नोंदविण्यात आले नाहीत? भाजपचे गुजरात मुख्यालय कमलम व नोटांचा साठा करणाऱ्यांमध्ये नेमके काय व्यवहार झाले यावर उजेड पडला पाहिजे. एका हॉटेलच्या रुममध्ये जुन्या नोटा मोजत बसलेल्या व्यक्तींची नावे उघड करावीत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक