शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानंतर आता काँग्रेसचा हिंदुत्ववादी अजेंडा; पहिल्यांदाच कार्यालयावर फडकला भगवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 12:26 IST

या कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यालयाला सजवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कार्यालयात भगवा रंग सगळ्यांमध्ये उठून दिसत आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशात यावर्षी होणाऱ्या निवडणुकांबाबत काँग्रेसनेही आपली रणनीती बदलली आहे. राज्याची राजधानी भोपाळमध्ये एक अजब नजारा पाहायला मिळाला. भोपाळ येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पहिल्यांदाच भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यालयाचा बाहेरील भागात आणि आतील सजावटीत सर्वत्र भगवा रंग दिसून येत आहे. रविवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पुजारी सेलचा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्षाने धर्मसंवाद आणि मठ मंदिर स्वायत्त संकल्प दिन म्हणून त्याचे आयोजन केले आहे. काँग्रेसच्या कार्यालयात भगवे झेंडे फडकवल्याचे दृश्य राज्यात पहिल्यांदा पाहायला मिळाल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यालयाला सजवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कार्यालयात भगवा रंग सगळ्यांमध्ये उठून दिसत आहे. मध्य प्रदेश काँग्रेस मंदिर पुजारी सेलचे प्रतिनिधी सुधीर भारती यांनी सांगितले की, मंदिर पुजारी सेलचे लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, महंत आणि राज्यभरातील मठ आणि मंदिरांचे पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, धर्मसंवाद कार्यक्रमात सहभागी होत आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या हिंदुत्वाच्या योजनेवर काम सुरू केले आहे.

या आयोजनाचा हेतू काय?पुढील ६ ते ७ महिन्यांनी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस हिंदू धर्माचा आदर करत नाही आणि इतर धर्माच्या नागरिकांचे लांगुनचालन करते असा आरोप भाजपाने अनेकदा केला आहे. अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. हनुमानाचे भक्त म्हणून छिंदवाड्यात त्यांची ख्याती आहे. कमलनाथ यांनी छिंदवाडाजवळील त्यांच्या मतदारसंघातील शिकारपूर गावात भव्य हनुमानाची मूर्ती बसवली आहे, पण काँग्रेसला त्याचा फारसा प्रचार करता आला नाही.

यावेळी भाजपाचे लक्ष छिंदवाडा आहे. यासाठी भाजपाने हिंदुत्वाच्या राजकारणातील प्रमुख चेहरा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना छिंदवाडामध्ये प्रोजेक्ट केले आहे. ते सातत्याने दौरे करत आहेत. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढणार असल्याचे कमलनाथ यांना स्पष्टपणे समजले आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेसने आतापासूनच भगवा अजेंडा राबवला आहे. काँग्रेसला असा कोणताही मुद्दा भाजपाच्या हाती सोपवायचा नाही म्हणजे त्यातून आपली प्रतिमा हिंदुत्वविरोधी आहे.

कमलनाथ हे भाजपासाठी आव्हान का बनले?२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील एकूण २९ लोकसभा जागांपैकी २८ जागा जिंकल्या होत्या. संपूर्ण देशात मोदी लाट होती, पण छिंदवाडा हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिला. २०२३ च्या विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हा गड जिंकायचा आहे. सध्या कमलनाथ छिंदवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याचवेळी त्यांचा मुलगा नकुलनाथ छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाHindutvaहिंदुत्व