पुरूषांच्या कृत्यांचा नेहमी स्त्रियांना त्रास का? आरोपीचे घर तोडल्याने उर्मिला मातोंडकर संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:20 PM2023-07-05T18:20:33+5:302023-07-05T18:21:10+5:30

कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

After a video of him urinating on a tribal youth went viral, accused Pravesh Shukla was arrested by the Madhya Pradesh government and bulldozer over his house but Bollywood actress Urmila Matondkar expressed her displeasure by expressing the feelings of t | पुरूषांच्या कृत्यांचा नेहमी स्त्रियांना त्रास का? आरोपीचे घर तोडल्याने उर्मिला मातोंडकर संतापली

पुरूषांच्या कृत्यांचा नेहमी स्त्रियांना त्रास का? आरोपीचे घर तोडल्याने उर्मिला मातोंडकर संतापली

googlenewsNext

नवी दिल्ली : एका आदिवासी युवकावर एक मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती लघवी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत संतापजनक घटना पाहून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तात्काळ पोलिसांना निर्देश दिले होते. हातात सिगारेट असलेली एक मद्यधुंद व्यक्ती, पायऱ्यांवर बसलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर लघवी करत असल्याचे व्हिडीओत दिसून येते. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता त्या विकृत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीच्या घरावर बुलडोझर देखील चालवण्यात आला. पण आता आरोपीच्या घरच्यांचा टाहो पाहून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आवाज उठवला आहे. 

दरम्यान, आरोपी हा भाजपा कार्यकर्ता असून अनेक नेत्यांसमवेतचे त्याचे फोटोही समोर आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर, काही तासांतच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्यातील आकूडपणा चालताना दिसून येतो. प्रवेश शुक्ला असे या आरोपी व्यक्तीचे नाव असून तो आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, माझा व त्याचा संबंध नसल्याचे आमदार केदार शुक्ला यांनी स्पष्ट केले. अटकेची कारवाई झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

आरोपीचे घर तोडल्यानंतर त्याच्या घरच्यांना अश्रू अनावर झाले. पण आरोपीच्या कृत्याची शिक्ष त्याच्या घरच्यांना का? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केला आहे. आरोपीच्या घरच्यांच्या भावना सांगताना उर्मिलाने म्हटले, "दुर्दैवी आणि दुःखी असून पुरुषांच्या कृत्याचा त्रास नेहमी स्त्रियांना का सहन करावा लागतो. प्रवेश शुक्लाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी शक्य तितकी कठोर शिक्षा द्यायला हवी होती. पण बुलडोझर हे उत्तर असू शकत नाही कारण कुटुंबातील इतर सर्व निष्पाप आणि दुर्बलांना याचा त्रास होतो."

आरोपीचे घर तोडले

आरोपीचे संतापजनक कृत्य 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक गरीब व्यक्ती पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत. निळी जीन्स आणि चेक्सचा शर्ट घातलेला एक माणूस त्याच्यासमोर उभा असल्याचे दिसते. तो सिगारेट ओढत या गरीब व्यक्तीच्या तोंडावर लघवी करत आहे. लघवी करणारा माणूस दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले. एवढेच नाही, तर मद्यधुंद अवस्थेत लघवी करणारा माणूस एका भाजप नेत्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. 


 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: After a video of him urinating on a tribal youth went viral, accused Pravesh Shukla was arrested by the Madhya Pradesh government and bulldozer over his house but Bollywood actress Urmila Matondkar expressed her displeasure by expressing the feelings of t

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.