शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Afghanistan Taliban Crisis : तालिबाननं आपला देश स्वतंत्र केला; मुनव्वर राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 20:33 IST

तालिबाननं रविवारी अफगाणिस्तानवर मिळवला होता ताबा. या प्रकरणी कवी मुनव्वर राणा यांनी केलं वादग्रस्त व्यक्तव्य. 

ठळक मुद्देतालिबाननं रविवारी अफगाणिस्तानवर मिळवला होता ताबा.या प्रकरणी कवी मुनव्वर राणा यांनी केलं वादग्रस्त व्यक्तव्य. 

अमेरिकेनं आपलं सैन्या माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं आपले पाय पसवण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, रविवारी अफगाणिस्तानवरतालिबाननं ताबा मिळवला. परंतु यानंतर भारतातूनही अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान ऊर्दू शायर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "तालिबाननं योग्य केलं. आपल्या जमीनीवर कशाही प्रकारे कब्जा केला जाऊ शकतो," असं विधान राणा यांनी केलं. 

तालिबानच्या दशतवादी नेटवर्कबद्दल बोलताना मुनव्वर राणा यांनी त्यांना दहशतवादी तर तुम्ही त्यांना म्हणत आहात असं म्हटलं. "तुम्ही उघडपणे म्हणता की प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो परंतु प्रत्येक दहशतवादी हा मुसलमान असतो. दहशतवाद्यांची व्याख्या इथे करण्यातच आली नाही, की कोण दहशतवादी आहे आणि कोण दहशतवादी नाही," असं ते म्हणाले. मुनव्वर राणा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "तालिबान दशतवादी संघटना असू शकते, परंतु जर ते आपल्या देशासाठी लढत आहेत, तर तुम्ही त्यांना दहशतवादी कसं म्हणू शकता," असंही त्यांनी नमूद केलं.

"ज्या देशाशी आपले दीर्घ कालावधीपासून संबंध राहिले असतील किंवा असं म्हणा की कधी तो भारताचाच भाग होता. तालिबानचं जे वागणं आहे त्याला दहशतवादी म्हणू शकत नाही, त्यांना तुम्ही अग्रेसिव्ह म्हणू शकता," असं राणा म्हणाले. 

सपा खासदारानंही केलं होतं वादग्रस्त वक्तव्यभारतातील काही राजकीय नेते तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात धक्कादायक विधान करताना दिसून आले. यामध्ये समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश आहे. "तालिबानची ही स्वातंत्र्यासाठी लढाई" असल्याचं वादग्रस्त विधान बर्क यांनी केलं आहे. "तालिबान अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढत आहे. अफागाणिस्तानचे स्वातंत्र्य हा त्यांचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य का आहे? तालिबान तिथली एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवं आहे," असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानwarयुद्धIndiaभारतAmericaअमेरिकाTerrorismदहशतवादSamajwadi Partyसमाजवादी पार्टी