Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 03:55 PM2021-08-25T15:55:35+5:302021-08-25T15:58:21+5:30

Afghanistan Crisis Update:

Afghanistan Crisis: ... so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India | Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

googlenewsNext

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी तेथून आपल्या नागरिकांना काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना भरात सरकारने अफगाणिस्तानमधूनभारतात सुरक्षित आणले आहे. (Afghanistan Crisis )मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये काही नागरिक आहेत, जे भारतात परत येऊ इच्छित नाहीत. या लोकांची संख्या ७० ते ८० च्या दरम्यान आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले हे हिंदू आणि शीख अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ते भारताकडून पाठवण्यात आलेली विमाने सोडत आहेत. या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांमध्ये भारतातून अफगाणिस्तानमध्ये पाठवली गेलेली विमाने रिकामी परत आली आहेत. (so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India)

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंधोक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील गुरुद्वारा कर्ते परवानमध्ये उपस्थित असलेले ७० ते ८० अफगाण शीख आणि हिंदू भारतात परत येऊ इच्छित नाही. त्यांचा कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्याची इच्छा आहे. हे लोक केवळ फ्लाईट सोडत नाही आहेत. तर इतर लोकांच्या येण्याच्या मार्गातही अडथळे आणत आहेत.

पुनीत सिंग यांनी सांगितले की, या लोकांना अमेरिका आणि कॅनडामध्ये जाण्याच्या नादात दोन वेळा विमान सोडले आहे. भारत सरकार उच्चस्तरीय सुविधा उपलब्ध करून देत असतानाही हे लोक भारतात येण्यास नकार देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीख संघटनांनी सर्व अफगाण शीख आणि हिंदूंना बाहेर पडण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली आहे. यामधून १०० जण काबुल विमानतळाबाहेर आले होते. मात्र त्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.

दरम्यान, गुरुद्वारामध्ये असलेल्या शीखांचे नेते तरविंदर सिंग यांनी एक व्हिडीओ संदेश पाठवला आहे. त्यात ते म्हणतात की, त्यांना भारतात यायचे नाही. तर अमेरिका किंवा कॅनडामध्ये जायचे आहे. अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यात चुकीचे काय आहे, असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. जे लोक भारतात गेले आहेत. त्यांची काय अवस्था झालीय हे आम्हाला माहिती आहे. ते परत अफगाणिस्तामध्ये आले किंवा परत इतर देशांमध्ये गेले.

तालिबानने गेल्या रविवारी काबुलवर कब्जा केलाहोता. त्यानंतर भारत सरकारने अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधून राजदूत आणि दुतावासामधील अन्य कर्मचाऱ्यांसह सुमारे २०० जणांना हवाई दलाच्या सी-१९ विमानातून भारतात परत आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमधून सामान्य नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे.  

Web Title: Afghanistan Crisis: ... so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.