आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 07:09 AM2024-05-10T07:09:58+5:302024-05-10T07:13:58+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope May 10, 2024 There will be financial benefits in some other way, progress in business | आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल

आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल

मेष

आपल्या राशी पासून चंद्र दुसरा असेल. आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.   आणखी वाचा

वृषभ

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल.    आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो.   आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल.   आणखी वाचा

सिंह

आपल्या राशी पासून चंद्र दशमात असेल. खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.    आणखी वाचा

कन्या

धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्‍या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल.   आणखी वाचा

तूळ

आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.   आणखी वाचा

वृश्चिक

10 मे, 2024 शुक्रवारी आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा असेल. आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील.    आणखी वाचा

धनु

10 मे, 2024 शुक्रवारी आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा असेल. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.    आणखी वाचा

मकर

आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कुंभ

आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल.आणखी वाचा

मीन

आपल्या राशी पासून चंद्र तिसरा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope May 10, 2024 There will be financial benefits in some other way, progress in business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app