शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 5:13 PM

गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजवळपास 1.60 लाख अफगाणी मुस्लिमांचे भारतात वास्तव्यजवळपास 40 हजार रोहिंग्या मुस्लीम संपूर्ण भारतात राहतात.गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला.

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यापासून (CAA) बचाव व्हावा यासाठी भारतात राहणाऱ्या अफगाण आणि रोहिंग्या मुस्लिमांनी धर्मांतर करायला सुरुवात केली आहे. भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा, यासाठी ते ख्रिश्चन धर्मात प्रवेश करत आहेत. केंद्रीय संस्थांनी यासंदर्भात सरकारलादेखील माहिती दिली आहे. किमान 25 अफगाण मुस्लिमांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचे या संस्थांना आपल्या तपासात आढळून आल्याचे समजते. यासंदर्भात द इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

CAA मध्ये 3 देशांतील नागरिकांसाठी सुलभ कायदे - गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी एखाद्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व हवे असेल तर, किमान 11 वर्ष येथे राहणे आवश्यक होते. मात्र, हा कालावधी आता शिथील करून एक ते सहा वर्ष करण्यात आला आहे. याचाच अर्थ या तीनही देशांतील वर उल्लेख केलेल्या सहा धर्मांतील कोल जर एक ते सहा वर्षांपासून भारतात येऊन राहत असतील, तर त्यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. अद्याप केंद्रीय गृह मंत्रालयाला CAA 2019 चे नियम नोटिफाय करायचे आहेत.

'अणेक मुस्लीमांची ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची इच्छा' -दक्षिण दिल्लीच्या अफगाण चर्चमध्ये जाणाऱ्या आबिद अहमद मॅक्सवेल यांनी ईटीसोबत बोलताना सांगितले, 'CAA कायदा मंजूर झाल्यापासून अफगाणिस्तानातून आलेल्या अनेक मुस्लिमांची ख्रश्चन धर्मात प्रवेश करण्याची इच्छा आहे.' 34 वर्षीय मॅक्सवेल 21 वर्षांचे होते तेव्हा भारतात आले होते. त्यांचे आई-वडील सुन्नी मुस्लीम होते आणि अफगाणिस्तानातील काबूल नजीक राहत होते. त्यांनी सांगितले, की जास्तीत जास्त अफगाणिस्तानातील मुस्लिमांनी संयुक्त राष्ट्राच्या हाय कमिश्नर फॉर रिफ्यूजीकडे (UNHCR) शरण मिळावी यासाठी अर्ज केला आहे.

जवळपास 1.60 लाख अफगाणी मुस्लिमांचे भारतात वास्तव्य -आधिकृत आकडेवारीनुसार, जवळपास 1.50 लाख ते 1.60 लाख अफगाण मुस्लीम दिल्लीच्या पूर्व कैलास, लाजपत नगर, अशोक नगर आणि आश्रम येथे राहतात. 

अनेक रोहिंग्या स्वतःला बांगलादेशी सांगतात -याशिवाय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की जवळपास 40 हजार रोहिंग्या मुस्लीम संपूर्ण भारतात राहतात. जम्मू-काश्मीरमध्ये ही सख्या सर्वाधिक आहे. रोहिंग्या मुस्लीम मोठ्या प्रमाणावर 2012पासून देशात राहतात आणि आता स्वतःला बांगलादेशी असल्याचे सांगत असून, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करत आहेत.

गेल्या 6 वर्षांत भारताने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या जवळपास 4 हजार लोकांना नागरिकत्व दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी 

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाAmit Shahअमित शहाMuslimमुस्लीम