श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 08:20 PM2020-09-24T20:20:52+5:302020-09-24T20:21:46+5:30

बाबर काद्री यांना केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नाही, तर देशभरात ओळखले जात होते. ते अनेक वेळा टीव्हीवरील डिबेटमध्येही असत. गोळी लागल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाताना रास्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Advocate Baber Qadri has been shot dead by unidentified terrorists in Hawal area of Srinagar | श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

Next
ठळक मुद्देश्रीनगर येथे गुरुवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी अ‍ॅडव्होकेट बाबर काद्री यांच्यावर हल्ला केला.बाबर काद्री यांना केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नाही, तर देशभरात ओळखले जात होते.जम्मू आणि काश्मीरमध्ये  दहशतवादी सातत्याने सर्वसामान्य लोकांवर हल्ले करत आहेत.

श्रीनगर येथे गुरुवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी अ‍ॅडव्होकेट बाबर काद्री यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. काद्री यांना हल्ल्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये  दहशतवादी सातत्याने सर्वसामान्य लोकांवर हल्ले करत आहेत.

बाबर काद्री यांना केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नाही, तर देशभरात ओळखले जात होते. ते अनेक वेळा टीव्हीवरील डिबेटमध्येही असत. गोळी लागल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाताना रास्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही बाबर काद्री यांच्या हत्येसंदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, “आज सायंकाळी वकील बाबर काद्री यांची झालेली हत्या दुःखद आहे आणि मी याचा निशेध करतो. त्यांनी आधीच आपल्या अखेरच्या ट्विटमध्ये स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते.”

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

पूर्वी बडगाम येथे गुरुवारी भाजपाच्या सरपंचाचीही हत्या करण्यात आली होती. येथील दलवाश गावात बीडीसी अध्यक्ष आणि भाजपाचे सरपंच भूपिंदर सिंग यांची त्यांच्या घरातच गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही तासांतच दहशतवाद्यांनी संरक्षल दलाच्या जवानांवरही हल्ला केला होता. सरपंचाच्या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

दहशतवाद्यांनी बांदीपोरा येथे तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर गुरुवारी गोळीबार केला होता आणि शस्त्रास्त्रे घेऊन फरार झाले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याचा मृत्यू झाला. 

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

Web Title: Advocate Baber Qadri has been shot dead by unidentified terrorists in Hawal area of Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.