शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

खडकाळे ग्रामपंचायतींवर चार दिवसांसाठी प्रशासक

By admin | Updated: August 7, 2015 21:35 IST

खडकाळे(कामशेत) ग्रामपंचायतींसाटी १९ ऑगस्टला फेर मतदान

खडकाळे(कामशेत) ग्रामपंचायतींसाटी १९ ऑगस्टला फेर मतदान
पुणे: मावळ गोळीबार प्रकरणानंतर खडकाळे (कामशेत) येथे येत्या १९ ऑगस्ट रोजी मतदान होत असून, मतदमोजणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर अधिसूचना जाहीर करुन सात दिवसांनी सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. परंतु खडकाळे ग्रामपंचायतींची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत असून, किमान चार दिवसांसाठी ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.
मावळ तालुक्यातील खडकाळे(कामशेत) येथे मनसेच्या तालुका अध्यक्ष यांच्यावर गोळीबार होऊन यात त्याचा मृत्यु झाला. या प्रकारानंतर संप्तत जमावाने येथील मतदान केंद्रांवर हल्ला करुन यंत्रांची तोडफोड केली. यामुळे दुपार नंतर येथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे येथे फेर मतदान घ्यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवला होता. खडकाळे गावत एकूण दहा मतदान केंद्र होती, यापैकी सात ठिकाणी फेरमतदान घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या १९ ऑगस्ट रोजी सात केंद्रांसाठी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत फेरमतदान घेण्यात येणार असून, दहा मतदान केंद्रांची मतमोजणी २० ऑगस्ट रोजी तालुक्याच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. या ग्रामपंचायतींची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत आहे. मतमोजणी झाल्यानंतर सात दिवसांची अधिसूचना जाहीर करुन नंतर सरपंच पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी २७ ते २८ ऑगस्ट उजाडणार आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट नंतर किमान चार दिवसांसाठी येथे प्रशासकाची नेमणूक करावी लागणार आहे.