शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:32 IST

फोटो-कांदा..

फोटो-कांदा..
सोलापूर: राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच नव्याने कांदा लावगडही अत्यल्प झाल्याने कांद्याचे दर भलतेच वाढले आहेत. याचे परिणाम शासन पातळीवर झाले असल्याने बाजार समितीत होणार्‍या कांद्याच्या आवक-जावकची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली जात आहे.
मागील वर्षभर शेतीमालाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दूध, ऊस व अन्य कोणत्याही उत्पादित मालापोटी शेतकर्‍यांना चांगला दर मिळाला नाही. कांद्याचेही असेच झाले आहे. वर्षभर प्रति क्विंटल दोन हजारांपेक्षा कमी दराने शेतकर्‍यांकडून कांद्याची खरेदी झाली आहे. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला कांदा आता बाजारात येऊ लागला आहे. बोटावर मोजण्याइतक्या शेतकर्‍यांकडेच आज कांदा आहे. कांद्याचे दर वाढल्याने कांद्याची होणारी आवक व खरेदीची माहिती दररोज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून घेतली जात आहे. मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 38 ट्रक कांदा आला होता. सोलापूर, अहमदनगर, पुणेसह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून कांद्याची आवक झाली. दररोज याच पटीत कांद्याची आवक होते. लिलावाद्वारे कांद्याची विक्री, स्थानिक बाजारात विक्री होणार्‍या कांद्याचा दर यात मोठी तफावत राहू नये, यासाठी प्रशासनाचे प्रय} असल्याचे सांगण्यात आले.
कोट
कांद्याची आवक फारच कमी आहे. जिल्?ातील शेतकर्‍यांकडे तर कांदाच नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी गेला पाहिजे, साठेबाजी होऊ नये यासाठी कांद्याची माहिती घेतली जात आहे.
बिभीषण लावंड
जिल्हा उपनिबंधक