आयआयटी मद्रासकडे मागितला अतिरिक्त अहवाल

By admin | Published: June 9, 2015 02:39 AM2015-06-09T02:39:58+5:302015-06-09T02:39:58+5:30

आयआयटी मद्रासने पाठविलेला अहवाल ‘अपूर्ण’ असल्याचे सांगून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या संस्थेला अतिरिक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Additional report asking for IIT Madras | आयआयटी मद्रासकडे मागितला अतिरिक्त अहवाल

आयआयटी मद्रासकडे मागितला अतिरिक्त अहवाल

Next

नवी दिल्ली : आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विद्यार्थ्यांच्या एका संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या संदर्भातील आयआयटी मद्रासने पाठविलेला अहवाल ‘अपूर्ण’ असल्याचे सांगून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या संस्थेला अतिरिक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्टडी सर्कलची मान्यता रद्द करण्याच्या वादाबाबत आयआयटी मद्रासचे संचालक सोमवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमक्ष हजर झाले होते. या संचालकांनी आयोगाकडे लेखी अहवाल सादर केला आहे. परंतु तो अपूर्ण आहे. आयआयटी मद्रासने एका सामान्य पत्रावर एवढी तीव्र प्रतिक्रिया का दिली, याबाबत संस्थेकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे, असे आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी सुनावणीनंतर पत्रकारांना सांगितले.
आयआयटी मद्रासने पत्रावर मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मत मागितले होते आणि त्यानंतर आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलची मान्यता थेट रद्द केली होती. मान्यता
रद्द करणे अनुचित असल्याचे मत पुनिया यांनी व्यक्त केले. ते
म्हणाले, आयआयटी मद्रासला अतिरिक्त अहवाल मागविण्यात आला आहे.
कारण सादर केलेला अहवाल अपूर्ण आहे. स्टडी सर्कलविरुद्ध कारवाई का केली, याचा खुलासा या अहवालातून होत नाही. या बैठकीला आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर रामामूर्ती आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे संयुक्त सचिव प्रवीणकुमार हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल स्टडी सर्कलची मान्यता रद्द करण्यात आली होती. परंतु यावर वादंग निर्माण झाल्यानंतर आयआयटी मद्रासने आपला निर्णय रविवारी मागे घेतला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Additional report asking for IIT Madras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.