शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मोदींच्या करिष्म्यासोबतच 'या' खास रणनीतीने भाजपाला उत्तर प्रदेशात मिळवून दिले बंपर यश 

By बाळकृष्ण परब | Published: May 26, 2019 9:59 AM

 नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला.

- बाळकृष्ण परबनवी दिल्ली -  नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. अगदी 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला. ती रणनीती म्हणजे मिशन 50 टक्के+. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्यासाठी आखलेली खास योजना. उत्तर प्रदेशात सपा-बसपा महाआघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाच्या पराभवाचे गणित मांडले जात होते. साधारण वर्षभरापूर्वीपासून येत असलेल्या विविध ओपिनियन पोलमधूनही तेच चित्र दिसत होते. त्यामुळे मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांचे व्यापक ऐक्य करून मतांचे गणित साधण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर तोडगा म्हणून आपला मतदार वाढवून 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याची रणनीती आखली गेली.विशेषत: उत्तर प्रदेशात महाआघाडीच्या मतांच्या गोळाबेरीजेवर मात करण्यासाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघात 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याच्या मोहिमेवर काम सुरू केले. त्यासाठी बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख अशा अगदी छोट्या पातळीवर नियोजन केले गेले. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी सुमारे सहा ते सात टक्क्यांनी वाढली. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात भाजपाला 62 जागा जिंकता आल्या. तर महाआघाडीच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांना जबर धक्का बसला. अगदी सपा, बसपा, रालोदसोबत काँग्रेसही आली असती तरी भाजपाला फारसे नुकसान झाले नसते.  मतदारसंघनिहाय विचार केल्यास उत्तर प्रदेशातील सुमारे 40 च्या आसपास मतदारसंघात भाजपाला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. तर पाच ते सहा मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी 49 ते 50 टक्क्यांच्यादरम्यान राहिली. उत्तर प्रदेशच नाही तर देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक राहिली. त्या राज्यांमध्ये गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाने 50 टक्के मतांचा टप्पा ओलांडला. तसेच भाजपाच्या निवडून आलेल्या 303 खासदारांपेकी 170 हून अधिक खासदारांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. भाजपाची ही मतांची वाढती टक्केवारी विरोधी पक्षांसाठी चिंतेची बाब आहे. कारण ही टक्केवारी कायम राखल्यास सर्वपक्षीय ऐक्यानंतरही भाजपाला पराभूत करणे विरोधी पक्षांना कठीण होणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथ