लोकमत आपल्या दारी जोड.. ५
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
नाल्यावर ढापे बसवावेत...
लोकमत आपल्या दारी जोड.. ५
नाल्यावर ढापे बसवावेत... अनेक ठिकाणी नाल्या उघड्या आहेत. मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यावर ढापे नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. शिवाय नालीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे अगोदर नाल्यावर ढापे बसवावेत, असे विष्णू जाधव यांनी सांगितले. विकासकामे नाहीत...नागरिक तक्रारी घेऊन गेल्यास सिडको प्रशासन प्रत्येक वेळी नुसते आश्वासन देते; परंतु करीत काहीच नाही. सिडको प्रशासनाकडून सध्या कोणतीच विकासकामे केली जात नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असा आरोप यशवंत चौधरी यांनी केला आहे. फवारणीवाले पैसे मागतात...अस्वच्छतेमुळे डास व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. सिडको प्रशासन औषध फवारणी करीत नाही. एखाद्या वेळी औषध फवारणी आलीच तर फवारणीवाले नागरिकांनाच पैसे मागतात. पैसे दिल्याशिवाय औषध फवारणी होत नाही, असा आरोप अनुराधा चव्हाण यांनी केला आहे. कचराकुंड्या नाहीत... कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्याच नाहीत. त्यामुळे नागरिक उघड्यावरच रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. कचरा उचलला जात नसल्यामुळे तो अनेक दिवस तसाच रस्त्यावर पडून राहतो, असे रंजना चौधरी यांचे म्हणणे आहे. विद्युत डीपी उघड्या....अनेक भागातील विद्युत डीपी उघड्या आहेत. विद्युत डीपीला कुलूप व संरक्षक जाळी लावलेली नाही. विद्युत वायर लोंबकळले आहे. त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा सांगूनही याकडे कोणी लक्ष देत नाही, असे मनीषा देसाई यांनी सांगितले. पथदिवे सुरू करावेत...सिडको ग्रोथ सेंटर भागातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. रात्रीला गस्त होत नाही. त्यामुळे चोर्या होत आहेत. प्रशासनाने किमान रस्त्यांवरील पथदिवे तरी सुरू करावेत, अशी मागणी रमाबाई इंगोले यांची आहे. गार्डन कायम बंद...नागरिकांना बसण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले सिडको ग्रोथ सेंटर भागातील गार्डन मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे. येथे सुरक्षारक्षकही नाही. गार्डन कायम बंद ठेवायचे असेल तर कशाला केले, असा मथुरा चव्हाण यांचा प्रश्न आहे. (जोड आहे)