Sky Striker Drone Operation Sindoor: पाकिस्तानच्या भूमीत वाढलेल्या आणि फोफावत असलेल्या दहशतवादी अड्ड्यांना भारताच्या लष्कराने जबरदस्त तडाखा दिला. ७ मेच्या रात्री भारतीय लष्कराने ऑपरेश सिंदूर लष्करी मोहीम राबवत तब्बल ९ अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराच्या या विशेष मोहिमेमध्ये स्काय स्ट्रायकर कामीकेज या ड्रोन्सचाही वापर करण्यात आला. हे ड्रोन्स विकसित करण्यात अदाणी समूहाच्या अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीचेही योगदान आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली. २६ पर्यटकांच्या या हत्येनंतर भारताने थेट त्यांच्या मूळांवरच घाव घातला. भारताने ७ मे रोजीच्या पहाटे १ वाजून ५ मिनिटांनी हे हवाई हल्ले करण्यात आले.
स्काय स्ट्रायकर ड्रोन्सचा कशासाठी झाला वापर?
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्काय स्ट्रायकर कामीकेज ड्रोन्सचा वापर दहशतवादी अड्ड्यांवरील बांधकामे उडवताना समन्वयासाठी करण्यात आला. हे हल्ले पूर्णपणे जमिनीपर्यंत जाऊन करण्यात आले आहेत.
कसे काम करतो स्काय स्ट्रायकर ड्रोन?
स्काय स्ट्रायकर एक मानवरहित विमानासारखे उडतो. हा ड्रोन मिसाईलसारखाच हल्ला करतो. याला सुसाइड ड्रोन सुद्धा म्हटले जाते. या ड्रोनचे वर्गीकरण लोटेरिंग दारूगोळा प्रकारत केले गेले आहे. लक्ष्य शोधण्यासाठी आणि त्यावर हल्ला करण्यासाठी हे ड्रोन त्या परिसरात घिरट्या घालत राहते. हे स्वयंचलितही असतात आणि माणूसही त्याला नियंत्रित करू शकतो.
वाचा >>भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
याच्या हल्ल्याचा आवाज खूप कमी असतो. त्यामुळेच याचा वापर कमी उंचीवर लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी केला जातो. बॅटरीवर चालणारा हा ड्रोन ५ किंवा १० किलो शस्त्रसाठा घेऊन उडू शकतो. ज्या प्रमाणे त्याला कमांड दिल्या जातात त्याप्रमाणे लक्ष्य शोधून हा ड्रोन उद्ध्वस्त करतो.