मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या बैठकीत दिसली उर्फी जावेद! शेअर केला PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 19:35 IST2022-01-22T19:22:44+5:302022-01-22T19:35:13+5:30

उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी कारण खूपच रंजक आहे. यावेळी ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या एका बैठकीत दिसून आली.

Actress Urfi javed seen in up cm yogi adityanath meeting, The actress shared the picture | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या बैठकीत दिसली उर्फी जावेद! शेअर केला PHOTO

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या बैठकीत दिसली उर्फी जावेद! शेअर केला PHOTO


अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. ती कधी तिच्या ड्रेसमुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा उर्फी जावेदचे नाव चर्चेत आले असून यावेळी कारण खूपच रंजक आहे. यावेळी ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या एका बैठकीत दिसून आली. चला तर, आम्ही आपल्याला दाखवणार आहोत, उर्फी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत कशी दिसली?

उर्फी जावेदला तिच्या एका चाहत्याने एक फोटो पाठवला, तो फोटो तीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीत शेअर केला. या फोटोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बैठक करताना दिसत आहेत. यादरम्यान त्याच्यासमोर एक टीव्ही सुरू असून उर्फी जावेदशी संबंधित बातम्या दाखवल्या जात आहेत.

उर्फ जावेद टीव्हीवर नेव्ही ब्लू कलरच्या साडीवर दिसत आहे. उर्फी जावेदने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, योगीजींसोबत या बैठकीला उपस्थित राहून चांगले वाटले. मला कुणी तरी हा फोटो पाठवला, बघून प्रचंड हसायला आले.

लखनऊच्या उर्फीने 2016 मध्ये टीव्ही शो 'बडे भैया की दुल्हनिया' मधील अवनी पंतच्या भूमिकेने करिअरची सुरुवात केली. 5 वर्षांच्या करियरमध्ये तीने 10 टीव्ही शोंमध्ये काम केले आहे. उर्फी जावेदला अभिनयासोबतच नृत्याचीही खूप आवड आहे. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये प्रवेश केल्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे, असे तिचे म्हणणे आहे. 
 

Web Title: Actress Urfi javed seen in up cm yogi adityanath meeting, The actress shared the picture