धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर घरात अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:58 IST2025-04-06T15:45:18+5:302025-04-06T15:58:56+5:30

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाजपा नेत्याच्या मुलीवर घरातच अॅसिड हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

Acid attack on BJP leader's daughter at home Investigation underway against accused | धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर घरात अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचा तपास सुरू

धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर घरात अ‍ॅसिड हल्ला; आरोपीचा तपास सुरू

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाजपा नेत्याच्या मुलीवर घरातच अॅसिड हल्ला झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बेगुसराय जिल्ह्यात घडली. अ‍ॅसिड हल्ल्यात भाजलेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयानक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही घटना बखरी नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक २३ मध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेली माहिती अशी, अ‍ॅसिड हल्ल्यात मुलगी गंभीररित्या भाजली आहे. शनिवारी रात्री ही मुलगी तिच्या घरात झोपली होती तेव्हा गुन्हेगारांनी घरात घुसून तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. अ‍ॅसिड फेकल्यानंतर ती मुलगी ओरडू लागली.

अरे देवा! गाडीतून उतरला अन् पोलिसांच्या समोरून आरोपी पळाला; व्हिडीओ व्हायरल

घराच्या खिडकीतून मुलीवर अ‍ॅसिड फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.अज्ञात गुन्हेगारांच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी अचानक झोपेतून उठली आणि तिच्या चेहऱ्यावर जळजळ होत असल्याची तक्रार तिने केली.

तक्रारीत मुलीने सांगितले की, कोणीतरी तिच्यावर अ‍ॅसिड फेकल्याचा संशय होता. तपासणीदरम्यान बेडवर अ‍ॅसिडचे अंश आढळले. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले की, ही एक दुःखद घटना आहे. या प्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार फरार असल्याचे सांगितले जात आहे.

मुलीच्या वडिलांचे नाव संजय सिंह राठोड आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि ते भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असल्याचेही बोलले जात आहे. त्यांच्या २४ वर्षीय मुलीवर पहाटे २ वाजताच्या सुमारास तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. संजय सिंह यांनी रात्रीच पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर आता पोलिस या प्रकरणात पुढील कारवाई सुरु केली.

Web Title: Acid attack on BJP leader's daughter at home Investigation underway against accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.