शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

कृत्रिम बुद्धिमत्तेने टीआरपीची अचूक मोजणी शक्य; आयटी तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 7:52 AM

कार्यक्रमांचे बनवा क्यू आर कोड; प्रेक्षकसंख्या व इतर बाबी समजतील

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिर्फिशिअल इंटेलिजन्स) मदतीने टीआरपीची अचूक मोजणी करता येईल, असे माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दूरचित्रवाहिन्यांना नेमका किती प्रेक्षकवर्ग लाभतो याची माहिती मिळविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे क्यू आर कोड तयार करता येतात. ते प्रेक्षकांना स्कॅन करून घेण्यास सांगावे. त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिसादावरून एखाद्या कार्यक्रमाला किती प्रेक्षकवर्ग लाभला याची संख्या कळू शकते. बनावट क्यू आर कोड शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे सतत तपासणी करत राहिल्यास या प्रक्रियेतील घोटाळे सहज पकडता येतील, असेही आयटी तज्ज्ञांनी म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांचा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या वृत्तवाहिन्यांना दर आठवड्याला देण्यात येणाºया रेटिंगची प्रक्रिया तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बीएआरसी या संस्थेने स्थगित केली आहे. कोणते कार्यक्रम किती वेळ, किती लोकांनी पाहिले याची माहिती डीटीएच आॅपरेटरकडे असते. ती मिळवून त्याचे विश्लेषण केल्यासही आपल्याला प्रेक्षकसंख्या व इतर बाबींची उत्तरे मिळू शकतील. या सर्व बाबी बारकाईने तपासण्यासाठी सोय असल्याने त्या प्रक्रियेची विश्वासार्हताही अबाधित राहू शकते.अचूक संख्या कळणारकृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला कोरोना रुग्णांची संख्या व त्या साथीचा फैलाव याचीही अचूक माहिती मिळू शकते. एखाद्या भूभागात जंगलाचे क्षेत्र विस्तारते की आक्रसते आहे, याचाही अचूक तपशील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जीपीएस यंत्रणेच्या साहाय्याने मिळविता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भविष्यात जगातील आणखी व्यवहार पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाला दैनंदिन व्यवहारातही या तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार आहे, असे आयटीतज्ज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :trp ratingटीआरपीTRP Scamटीआरपी घोटाळा