Accident:अर्ध्यावरती डाव मोडला... कार खोल दरीत कोसळून तरुण पती-पत्नीचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:18 IST2022-02-23T14:17:28+5:302022-02-23T14:18:25+5:30
Accident News: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण कार अपघातामध्ये तरुण पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला

Accident:अर्ध्यावरती डाव मोडला... कार खोल दरीत कोसळून तरुण पती-पत्नीचा मृत्यू, तिघे जखमी
सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण कार अपघातामध्ये तरुण पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. मंडी मधील सुंदरनगर उपविभागातील निहरी भागात एक कार खोल दरीत कोसळली. या अपघातात पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारे तिघे अन्य प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर सिव्हील रुग्णालय, सुंदरनगर येथे सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार निहरी क्षेत्रातील पंडारमध्ये एक कार खोल दरीत कोसळली. कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सीएचसी रोहांडा येथे नेण्यात आले. येथे ३३ वर्षीय इंद्र सिंह यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. तर अन्य जखमींची गंभीर प्रकृती पाहून त्यांना सुंदरनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान, रात्री उशिरा इंद्र सिंह यांच्या २७ वर्षीय पत्नीनेही प्राण सोडले.
दरम्यान, या भीषण अपघातामध्ये डोलाराम (४०), प्रभा देवी (३२) आणि रुहीन (७) हे जखमी झाले. त्यांच्यावर सुंदरनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.