Accident, son of the minister of education, dies on friend's marriage of uttarakhand | मित्राच्या लग्नाला जाताना भीषण अपघात, शिक्षणमंत्र्यांच्या मुलाचा मृत्यू 
मित्राच्या लग्नाला जाताना भीषण अपघात, शिक्षणमंत्र्यांच्या मुलाचा मृत्यू 

देहरादून - उत्तराखंडमधील भाजपा नेते आणि मंत्री अरविंद पांडे यांच्या मुलाच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात अरविंद पांडे यांचा मुलगा अंकुर याचा मृत्यू झाला आहे. आपल्या मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी तो चारचाकी गाडीने प्रवास करत होता. बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 24, बरेलीजवळ फरिदपूर येथे अंकुरच्या कारची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

अरविंद पांडे हे उत्तराखंडचे शिक्षणमंत्री असून त्यांचा मुलगा अंकुर हा मित्राच्या लग्नासाठी फरिदपूरला जात होता. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अंकुरला अपघातानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अंकुरबरोबर इतर दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी एकजण जखमी असून तो कोमात असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर उत्तराखंडच्या सर्व मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला आहे.  


Web Title: Accident, son of the minister of education, dies on friend's marriage of uttarakhand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.