Accident : देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, भरधाव बोलेरो मागून ट्रकवर आदळली, उडाल्या चिंधड्या, ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:31 AM2022-04-15T11:31:40+5:302022-04-15T11:32:14+5:30

Accident: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्रीदरम्यान सुमारे १२.३० वाजता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले.

Accident: A tragic accident on the way to Devdarshan, Six Killed | Accident : देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, भरधाव बोलेरो मागून ट्रकवर आदळली, उडाल्या चिंधड्या, ६ जणांचा मृत्यू

Accident : देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, भरधाव बोलेरो मागून ट्रकवर आदळली, उडाल्या चिंधड्या, ६ जणांचा मृत्यू

googlenewsNext

जयपूर - राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्रीदरम्यान सुमारे १२.३० वाजता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले. हा अपघात बिलाडा पोलीस ठाणे क्षेत्रात झाला. भरधाव बोलेरो ट्रकवर मागच्या बाजूने आदळून हा अपघात झाला. ही टक्कर एवढी भीषण होती की त्यात बोलेरोचे तुकडे तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य पोहोचवले. 
मिळालेल्या माहितीनुसार चुरू येथील विजय सिंह आणि त्यांचे कुटुंबीय कुलदेवता नागणेची मातेच्या दर्शनासाठी जयपूर येथून जोधपूर येथे जात होते. संपूर्ण कुटुंब बोलेरोमधून जात होते. त्यावेळी रस्त्यात त्यांची भरधाव बोलेरो समोर असलेल्या ट्रक वर आदळली. 
या अपघातात एका मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले त्यांना उपचारांसाठी जोधपूर येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Accident: A tragic accident on the way to Devdarshan, Six Killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.