अजबच! फरार आरोपी निवडणूक लढला, जिंकला व गावाचा प्रमुखही बनला; पोलिसांना पत्ताच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:32 PM2021-07-21T13:32:00+5:302021-07-21T13:32:58+5:30

प्रशासकीय कामातील फोलपणा आणि त्रुटी यातून पुन्हा एकदा समोर आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

abscond smuggler won up panchayat election and take oath police continue search him | अजबच! फरार आरोपी निवडणूक लढला, जिंकला व गावाचा प्रमुखही बनला; पोलिसांना पत्ताच नाही

अजबच! फरार आरोपी निवडणूक लढला, जिंकला व गावाचा प्रमुखही बनला; पोलिसांना पत्ताच नाही

Next

मुरादाबाद:उत्तर प्रदेशातील मुरादाबाद म्हणजे अजबच घटना समोर आली आहे. इनाम असलेल्या एका कुख्यात गँगस्टारचा उत्तर प्रदेश पोलीस कसून शोध घेत होते. मात्र, त्यातच उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुका लागल्या. इनाम असलेल्या आरोपीने निवडणुकीसाठी अर्ज केला. निवडणूक जिंकला आणि एवढेच नव्हे तर गावातील प्रमुख म्हणून शपथही घेतली. मात्र, पोलिसांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता. प्रशासकीय कामातील फोलपणा आणि त्रुटी यातून पुन्हा एकदा समोर आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (abscond smuggler won up panchayat election and take oath police continue search him)

या कुख्यात आरोपीचे नाव संजय सिंह असून, त्याला ५० लाख रुपयांच्या ३० हजार लीटर बनावट दारूसकट पोलिसांनी अटक केली होती. मे महिन्यात त्याला या प्रकरणी जामीन मिळाला होता. मात्र, अन्य प्रकरणातील चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. काही केल्या पोलिसांना तो सापडत नव्हता. या संजय सिंह विरोधात पोलिसांनी गँगस्टर अॅक्टखाली गुन्हा नोंदवला. तसेच २० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. 

“जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात”; भाजप नेत्याचा मोदींना टोला

निवडणूक लढला आणि जिंकलाही

याच दरम्यान मुरादाबादमधील निवाड गावात निवडणुका लागल्या. संजय सिंह याने निवडणुकीसाठी अर्ज भरला, निवडणूक लढला आणि जिंकूनही आला. यानंतर गावातील सरपंच म्हणून शपथही घेतली. एवढा सगळा प्रकार होऊनही पोलिसांना याचा जराही पत्ता लागला नाही. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

दरम्यान, हा प्रकार समजताच विशेष टास्क फोर्सने संजय सिंहला अटक करत कारागृहात डांबले आहे. पोलिसांना या प्रकार माहिती नसल्याबाबत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक शलभ माथुर यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक धर्मेंद्र सिंह, महेश चंद्र शर्मा, महिला पोलीस कर्मचारी सरोज, हवालदार मोहित नौटियाल यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: abscond smuggler won up panchayat election and take oath police continue search him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.