रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:52 AM2021-07-20T11:52:55+5:302021-07-20T11:57:37+5:30

रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. कशी मिळवायची फ्रेंचायजी? पाहा, डिटेल्स...

कोरोना कालावधीत अनेक उद्योग, कंपन्या, व्यवसाय बंद झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, याच कालावधीत मेडिकल क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

मेडिकल आणि अत्यावश्यक सेवेतील सेवा कंपन्यांची उलाढाल याच कालावधीत कोट्यवधींनी वाढली असून, शेअर मार्केटही उच्चांकी पातळीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून Generic औषधांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच सामान्य जनतेचा कलही Generic औषधे घेण्यामागे वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

Generic औषधांच्या क्षेत्रात आताच्या घडीला मोठी स्पर्धा नसल्याचे दिसून येत आहे. यातच आता Generic Aadhaar या कंपनीची फ्रेंचायजी सुरु करून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. मेडिकल चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही Generic Aadhaar ची फ्रेंचायजी सुरु करता येते.

विशेष म्हणजे अन्य औषध कंपन्यांच्या फ्रेंचायजीसमध्ये तुम्हाला १५ ते २० टक्के मार्जिन मिळते. मात्र, Generic Aadhaar ही कंपनी फ्रेंचायजी चालवणाऱ्यांना तब्बल 40 टक्के मार्जिन देते, असे सांगितले जात आहे.

Generic Aadhaar च्या औषधांच्या किंमती कमी असल्याने त्यांना मागणी जास्त असते. परिणामी खपही चांगला होत असल्याचे बोलले जाते. याशिवाय, कंपनीकडून टेक्निकल सपोर्ट, लोकल ऑनलाईन ऑर्डर अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. आताच्या घडीला Generic Aadhaar जवळपास ७०० ते १००० प्रकारच्या जेनेरिक औषधांची विक्री करते.

Generic Aadhaar च्या संकेतस्थळावर गेल्यास Business Opportunity असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास फ्रेंचायजी घेण्यासाठीचा फॉर्म मिळेल. याठिकाणी आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, शहराचे नाव, ईमेल आयडी असा सर्व तपशील भरावा लागतो. याशिवाय, तुम्ही संकेतस्थळावर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधूनही फ्रेंजायजीची माहिती मिळवू शकता.

संपूर्ण देशभरात ३० हजार रिटेल आऊटलेट उघडण्याचे लक्ष्य कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. प्रत्येक शहरात कंपनीची १०० दुकाने असतील, अशी योजना आहे. आतापर्यंत देशातील १८ राज्यांमध्ये Generic Aadhaar च्या फ्रेंचायजी सुरू झाल्या आहेत.

सन २०१८ मध्ये ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती रतन टाटा यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

दुसरीकडे, अलीकडेच टाटा समूहाने 1MG कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.