AAP MLA: 'आप' आमदाराने पूर्ण केलं पहिलं वचन, केवळ 1 रुपया मानधन अन् 'नो पेन्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:24 AM2022-03-25T10:24:30+5:302022-03-25T10:27:56+5:30

जसवंत सिंग हे आपल्या भागात आरोग्य, शिक्षण आणि इतत सुविधांसाठी प्रयत्नशील आहेत

AAP MLA: 'Aap' MLA Jaswant singh dev fulfills first promise, only 1 rupee honorarium and 'no pension' | AAP MLA: 'आप' आमदाराने पूर्ण केलं पहिलं वचन, केवळ 1 रुपया मानधन अन् 'नो पेन्शन'

AAP MLA: 'आप' आमदाराने पूर्ण केलं पहिलं वचन, केवळ 1 रुपया मानधन अन् 'नो पेन्शन'

Next

चंडीगड - आपल्या व्यवसाय आणि सेवाकार्यासाठी प्रदेशात परिचीत असलेले अमरगढचे आमदार आणि आम आदमी पक्षाचे नेते जसवंत सिंग यांनी निवडणुकांपूर्वी लोकांना दिलेलं पहिलं वचन पूर्ण केलं आहे. जसवंत सिंग यांनी केवळ 1 रुपया वेतन आणि पेन्शन सोडणार असल्याचं वचन जनतेला दिलं होतं. आपलं राज्य अगोदरच आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे, त्यामुळे मी तिकीट मिळाल्यानंतर केलेल्या घोषणेची पूर्तता करत असल्याचं सिंग यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापूर्वी नाभाचे आमदार गुरदेवसिंग देव मान यांनीही 1 रुपयाच वेतन घेणार असल्याचे घोषित केले होते.  

जसवंत सिंग हे आपल्या भागात आरोग्य, शिक्षण आणि इतत सुविधांसाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे पुढील काही महिन्यांतच मतदारसंघात हा बदल झालेले दिसून येईल, असे त्यांना वाटते. व्यापार आणि सामाजिक कार्याशी जोडला गेलं असल्याने मी सर्वच नागरिकांसाठी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळेच, बहुतांश मतदारांना मी व्यक्तीश: ओळखतो. आपल्या सरकारने पहिल्याच दिवशीपासून कामाला सुरुवात केली आहे. मी मतदारांना निवडणुकांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्याकडे गंभीरतेने पाहतो. 

सिंग यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना मोठ-मोठी आश्वासनं दिली नाहीत. त्यांनी केवळ तीच आश्वासनं दिली, जी पूर्ण केली जाऊ शकतात. मी मतदारांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे, इतर पक्षाच्या नेत्यांसारखं मतदारांना मूर्ख बनवायला आलो नाही, असेही जसवंतसिंग यांनी म्हटले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जसवंतसिंग यांना निवडणुकीत 44,523 मतं मिळाली. तर, शिअद (ए) उमेदवार सिमरनजीत सिंग मान यांना 38,480 मतं मिळाली आहेत. 

गुरदेवसिंग हेही 1 रुपयाच मानधन घेणार

नाभा येथील आम आदमी पक्षाचे आमदार गुरदेव सिंग देव मान यांनीही केवळ 1 रुपयाच वेतन घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते. मात्र, काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण, यंदा त्याच काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करत ते आपचे आमदार बनले आहेत. विशेष म्हणजे विजयानंतरही त्यांनी घोषणा केली होती, की नाभा मतदारसंघात आपण सायकलवर फिरुनच लोकांच्या समस्या जाणून घेणार. सायकलवरुन फिरल्याने लोकं कुठेही आपणास भेटू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच, केवळ महिना 1 रुपये मानधन स्वरुपात पगार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. 
 

Web Title: AAP MLA: 'Aap' MLA Jaswant singh dev fulfills first promise, only 1 rupee honorarium and 'no pension'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.