शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या नगरसेविकेला लाच घेताना CBI ने केली अटक, शेंगा विक्रेता मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:20 IST

गीता रावत यांच्या अटकेनंतर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. रावत यांनी आपल्या घरावर छत टाकण्यासाठी अवैधपणे ही लाच घेतली होती.

नवी दिल्ली - सीबीआयने आम आदमी पक्षाच्या एका नगरसेविकेला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आपच्या नेत्या आणि नगरसेविका गीता रावत यांनी 20 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेंगा विकणाऱ्या व्यक्तीकडून हा पैसा गीता रावत यांच्याकडे पोहोचविण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या विधानसभाक्षेत्र पटपडगंज येथील विनोद नगर वार्डातून गीता रावत यांना अटक करण्यात आली आहे.

गीता रावत यांच्या अटकेनंतर राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. रावत यांनी आपल्या घरावर छत टाकण्यासाठी अवैधपणे ही लाच घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मुलास अटक झाल्याचे शेंगा विक्रेते सनाउल्लाह यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, तसेच मुलाला अटक करण्याचे कारणही विचारले. त्यावेळी, सीबीआयने त्यांची ओळख सांगून काही वेळातच तुम्हाला समजेल, असं उत्तर दिलं. सीबीआयने संपूर्ण घटनेचा खुलासा केला.  नगरसेविकास गीता रावत या शेंगा विक्रेत्याद्वारे लाच घेत होत्या. सीबीआयने माहिती घेतल्यानंतर या नोटाला रंग लावून शेंगा विक्रेत्याकडे पैसे दिले होते. तेच पैसे गीता रावत यांना देत असताना शेंगा विक्रेत्यासह गीता रावत या दोघांनाही सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या पथकाने संबंधित नोटा जप्त करुन दोघांनाही सोबत नेले आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर भाजपने आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. दिल्ली भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन, “केजरीवाल जी “आप” की यह कैसी ईमानदारी, रिश्वत लेते हो रही आपके नेताओं की गिरफ़्तारी? असे खोचक ट्विट केलं आहे. तर, आता कुठलं नवीन कारण देणार आपण? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण